गोवा पोलिस कॉन्स्टेबल्ससाठी निवड चाचणी ‘या’ दिवशी

चाचणीची वेळ, तारीख, ठिकाण अर्जदारांना कॉल लेटरद्वारे कळवणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः यावर्षी मार्चमध्ये पोलिस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी निवड चाचणी होणार असल्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यात होणारी ही निवड चाचणी आता 16 जून 2021 रोजी होणार असल्याचं गोवा सरकारच्या पोलिस महासंचालक कार्यालयतर्फे कळविण्यात आलं आहे. मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी माहिती दिली आहे की कॉन्स्टेबल पदासाठी – पुरुष आणि महिलांची 16 जून रोजी निवड केली जाईल.

हेही वाचाः चिकनमुळे ब्लॅक फंगस पसरतोय का?

16 जून रोजी चाचणी

याविषयीची अधिकृत माहिती देणारी सूचना पोलिस मुख्यालयातर्फे जारी करण्यात आली आहे. दिनांक 28 मार्च 2021 च्या स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरात क्रमांक 01 वर्ष 2021 च्या अनुषंगाने पोलिस कॉन्स्टेबल (पुरुष आणि महिला) पदांवर अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप (उंची, छाती/वजन) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (100 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, 800/400 मीटर धावणे) असलेल्या निवड चाचण्या आणि 30 एप्रिल 2021 च्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आलेले परिशिष्ट नुसार 16 जून 2021 पासून निवड चाचणी सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.

पुढील माहिती कॉल लेटरद्वारे कळवणार

निवड चाचण्यांची वेळ, तारीख आणि ठिकाण अर्जदारांना कॉल लेटरद्वारे कळवले जाईल, असंही सूचनेत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज केलेल्या पुरुष आणि महिला अर्जदारांना याची नोंद घेण्याची विनंती गोवा सरकारच्या पोलिस महासंचालक कार्यालयतर्फे करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!