ऑनलाईन प्रवेशाची दुसरी फेरी

उच्च शिक्षण संचालनालयाची माहिती; पहिल्या फेरीत ७५०० विद्यार्थ्यांना प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी बुधवार २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यामध्ये बी.ए, बी.कॉम, बीएस्सी, संगीत, थिएटर, गृहविज्ञान आदी शाखांचा समावेश आहे. ही प्रवेश प्रक्रिया २ सप्टेंबर पर्यंत खुली असणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे महादेव गावस यांनी दिली. इच्छुक अर्जदारांनी https://www.dhe.goa.gov.in/ वर उपलब्ध असलेल्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. हे संकेतस्थळ बुधवारी सकाळी 10:30 पासून सुरू होईल. या संकेतस्थळावर अर्जदारांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध होतील, असंही गावस यावेळी म्हणाले.

हेही वाचाः पोलीस खात्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांची बदली

अशी आहे प्रक्रिया

१. वरील संकेतस्थळाद्वारे पोर्टलद्वारे अर्जदार गोव्यातील जास्तीत जास्त तीन महाविद्यालयांना त्यांच्या आवडीनुसार अर्ज करू शकतात.
२. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अर्ज न केलेले विद्यार्थी नवीन अर्जासह नोंदणी करू शकतात.
३. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांच्या अर्जाची स्थिती प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अपूर्ण होती, ते विद्यार्थी अर्ज नव्याने संपादित करू शकतात.

प्रथम वर्षासाठी ७५०० विद्यार्थ्यांना प्रवेश

प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रथम वर्षासाठी विविध महाविद्यालयांमध्ये एकूण 7,500 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

सर्व महाविद्यालयांमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्षाचे ऑनलाईन प्रवेशही सुरू झाले आहेत. आतापर्यंत सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली असल्याचं गावस यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!