स्कूटीचा अपघात, एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

दाबोळीत स्कूटीचा भीषण अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : दाबोळीत स्कूटीचा अपघात झालाय. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की स्कूटीचा समोरचा भाग पूर्णपणे चेपल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरुन स्कूटीचा वेग नेमका किती असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

नेमका कुठे झाला अपघात?

दाबोळी येथील नौदलाच्या एनएसडीसमोरच्या वाहतूक बेटाला शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकी धडकली आणि हा अपघाड घडला. या अपघातात दुचाकीस्वार प्रकाश कुमार हा जागीच ठार झाला. प्रकाश कुमारचं वय ३५ असल्याचं कळतंय. तर दुचाकीवरील दुसरा युवक बबलू सुमन हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय इस्पतळामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघातप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केला.

हेही वाचा – FIRE | भीषण! बेताळभाटीत स्वयंपाकघर आगीच्या भक्षस्थानी

अपघातग्रस्त कुठचे?

प्रकाश कुमार आणि बबलू सुमन हे मूळचे बिहारचे असून ते कामानिमित्त दाबोळी येथे वास्तव्य करतात. ते दोघेही एका खाजगी कंपनीमध्ये काम करीत होते. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते झुआरीनगर येथून दाबोळीकडे आपल्या निवासस्थानी येत असताना त्यांच्या दुचाकीची ठोकर वाहतूक बेटाला बसली.

हेही वाचा – ACCIDENT ! धावत्या रेल्वेवर आदळला ट्रक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!