Accident | पणजी आरोग्य केंद्रासमोर स्कूटर आणि टेम्पोचा अपघात

सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र काही काळ वाहतूक कोंडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पणजी आरोग्य केंद्रासमोर स्कूटर आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातामुळे आरोग्य केंद्रासमोर वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. अपघातानंतर टेम्पो चालक गाडीतच बसून राहिल्यानं संतापलेल्या दुचाकीस्वारासर स्थानिक नागरिकांनीही टेम्पो चालकाला घेराव घातला होता.

कसा झाला अपघात?

पणजी आरोग्य केंद्रासमोर एक टेम्पो आणि स्कूटीचा किरकोळ अपघात झाला. GA 07 E 3167 या नंबरच्या दुचाकीला थोडक्यात वळणावर टेम्पोची धडक बसली. सुदैवानं टेम्पो वेगात नव्हता म्हणून मोठा अनर्थ टळलाय. नजर चुकीमुळे हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलंय. GA 04 T 2666 नंबरचा एक आयशर टेम्पोची समोरची डावी बाजू स्कूटी मागच्या बाजूला धडक बसली आणि या धडकेस स्कूटीसह चालक रस्त्यावरच कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा – Video | पार्से खाजनगुंडो बांध या पर्यटनस्थळाजवळ भली मोठी मगर पकडली

हेही वाचा – भीषण अग्नितांडव! टायर डम्पयार्डला लागलेल्या आगीची धग अंतराळातूनही दिसली

बाचाबाचीमुळे गर्दी

दरम्यान, या अपघातानंतर दुचाकीस्वार आणि टेम्पो चालक यांच्या बाचाबाची झाली. चूक कुणाची यावरुन झालेल्या बाचाबाचीमुळे स्थानिकांनीही घटनास्थळी गर्दी केली. यामुळे या मार्गावरील वाहतुकीची काही काळ कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. एकूणच या घटनेमुळे राज्यात रस्ते अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

हेही वाचा – Video | त्या नराधमांना नागडं करुन उठाबशा काढायला लावल्या

अपघाताचं सत्र सुरुच

रोज अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणे, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत. रविवारी रात्रीही फोंडा तालुक्यातील कवळे येथे असाच एक अपघात घडला होता. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाऊण वाडा कवळे येथे दुचाकीची रस्त्यावर बसलेल्या गाईला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले होते.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!