वेळापत्रक आलं! शालेय अंतिम परीक्षा घरातूनच…?

गोवा शिक्षण खात्याने शाळा तसंच बारावीच्या परीक्षांबाबत एक मोठा निर्णय घेतलाय...

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः करोना व्हायरसचा फैलाव भारतात होऊ लागला आणि सगळ्यात आधी संकट ओढवलं ते परीक्षांवर. कारण मार्च महिना हाच मुळात परीक्षांचा मोसम असतो. दहावी, बारावीच्या प्रत्येक राज्यातल्या परीक्षा या काळात सुरू असतात. त्यानंतर पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षादेखील याच महिनाअखेरपासून सुरू होतात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जे खबरदारीचे उपाय योजण्यात आले त्यात पहिला उपाय म्हणजे शाळा बंद करणं हाच होता. मुलांना आणि ज्येष्ठांना या विषाणूची लागण होऊ नये याची काळजी घेतली गेली. या दोन्ही वयोगटात रोगप्रतिकारकशक्ती शरीरात कमी असते. परिणामी शाळा आधी बंद करण्यात आल्या. पण मग परीक्षांचं काय करायचं या प्रश्नानेही डोकं वर काढलंच… मार्च २०२० संपून मार्च २०२१ समोर येऊन ठेपलं तरी करोना जाता जाईना, आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्नही सुटता सुटेना. गोवा शिक्षण खात्याने शाळा तसंच बारावीच्या परीक्षांबाबत एक मोठा निर्णय घेतलाय..

काय आहे निर्णय?

गोव्यातील शाळा तसंच बारावीच्या परीक्षांबाबत गोवा शिक्षण खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयात त्यांनी परीक्षा कुठे घेतल्या जाणार आहेत याबद्दल सांगितलंय. गोवा शिक्षण खात्याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अंतिम परीक्षांसाठी परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षं वाया जाऊ नये यासाठी सरकार आपल्यापरीने योग्य ती खबरदारी घेत पावलं उचलतंय. त्यामुळे एकूणच विचार करून शिक्षण खात्याने घरातून परीक्षा देण्यास परवानगी दिलीये. तसंच तिसरी ते आठवीपर्यंतच्या फायनलच्या परीक्षा लेखी स्वरूपात होतील, अशीही माहीत समोर येतेय.

११ जानेवारीपासून प्रॅक्टिकल्स

लेखी परीक्षांसोबतच प्रॅक्टिकल परीक्षांचा प्रश्नही शिक्षण खात्याने निकालात काढलाय. विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावी, बारावी व व्यावसायिक शाखेच्या प्रॅक्टिकल्स ११ जानेवारीपासून घेण्याची परवानगी गोवा शिक्षण खात्याने दिलीये. या प्रॅक्टिकल्य ऑफलाईन होतील, अशी माहितीही समोर येतेय.

गोवा शालांत मंडळाने दहावी, बारावी परीक्षा २६ एप्रिल ते १६ मेपर्यंत घ्यायचे नक्की केले होते. आता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात बदल होऊ शकतो.

Posted by Goanvarta on Thursday, 7 January 2021

विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य

विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य आहेत. सरकारने योग्य तो विचार करूनच हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता त्यांना घरातून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात निर्णय घेण्यात आल्याचं गोवा शिक्षण खात्याने म्हटलंय. सरकारने कोरोनामुळे उद्भवलेल्या सर्व आव्हानांचा सामना करून परीक्षेचं सुरक्षित आयोजन करण्यासाठी काळजीपूर्वक योजना आखली, असंही गोवा शिक्षण खात्याने म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!