Politics | आता २६ फेब्रुवारीला आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघणार? सुप्रीम कोर्ट म्हणतं की…

सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आता ही सुनावणी घेतली जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि मगोपच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतच्या याचिकेबाबत सभापती २६ फेब्रुवारीला अंतिम निर्णय देत हा प्रश्न निकाली काढतील , असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे आता सभापती राजेश पाटणेकर २६ फेब्रुवारीला हा प्रश्न निकाली काढताना काय निर्णय देतात, याकडे राज्यांचं लक्ष लागलंय.

assembly

२०१९ साली काँग्रेसच्या दहा आणि मगोपच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बंडखोर आमदारांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि आमदार सुदिन ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली.

काय घडलं होतं?

डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर २६ मार्च २०१९ रोजी मध्यरात्री प्रथम विद्यमान उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनी मगोतून, तर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, मंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार बाबूश मॉन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा यांनी जुलै २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता.

आजगावकर आणि प्रभू पाऊस्कर यांनी मगोच्या दोन तृतीयांश विधीमंडळ गटाचे भाजपमध्ये विलीन झाल्याचे पत्र सभापतींना दिले होते. त्यानंतर आमदार सुदिन ढवळीकर यांनी दोघांच्या विरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. या याचिका निकालात काढण्यास सभापती चालढकलपणा करत असल्याचा ठपका ठेवून ढवळीकर आणि चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत अखेर २६ फेब्रुवारीला सभापती प्रश्न निकाली काढतील, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यताय.

हेही वाचा –

Panchnama | तुमचा फोन हॅक होण्याआधी हा व्हिडीओ बघा!

एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!