‘सावंत, तुम्ही प्रत्येक गोंयकारापर्यंत पाणी पोचवू शकत नाही; मोफत पाणी कसं देणार?’

'आप'चे नेते महादेव नाईकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी आपल्या खोट्या आश्वासनांच्या यादीत अजून एका आश्वासनाची भर घातली आहे. गोंयकारांना सष्टेंबरपर्यंत मोफत पाणी देण्याच्या आश्वासनावर आम आदमी पार्टी (आप)च्या महादेव नाईकांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलंय. ‘सावंत, तुम्ही प्रत्येक गोंयकारापर्यंत पाणी पोचवू शकत नाही; मोफत पाणी कसं देणार?’ असा सवाल नाईकांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

हेही वाचाः प्रो. एम के जनार्थनम गोवा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्त

अवघ्या 15 दिवसांत मोफत पाणी देणं कसं काय शक्य करून दाखवणार?

सावंत सरकारच्या घोषणेनंतर पीडब्ल्यूडी अधिकारी अवघ्या 15 दिवसांत मोफत पाणी देणं कसं काय शक्य करून दाखवणार आहेत, असं नाईकांनी विचारलंय. पाण्याची पाईपलाईन फुटणं ही जवळजवळ दैनंदिन घटना आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री मोफत पाणी कसं पोचवणार? तुये, चोपडे, शिवोली, सावर्डे, सांगे यासह अनेक भागात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. या समस्येवर आजपर्यंत कामस्वरूपी तोडगा काढणं सरकारला शक्य झालेलं नाही, तर या नवीन घोषणेची पूर्तता सरकार कसं काय करणार, अशी शंका नाईकांनी उपस्थित केलीये.

गोव्याच्या पाण्यात उच्च पातळीचे मायक्रोप्लास्टिक्स असल्याचं समोर

सावंत सरकार म्हादई नदीवरील गोव्याचे हक्क सुरक्षित करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणूनच गोंयकारांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय. ‘आप’च्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा संपूर्ण गोव्यात पाण्याच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. यावरून हे स्पष्ट आहे, की सावंत सरकारकडे या समस्यांचं निवारण करण्यासाठी काही योजना नाहीत. किंबहुना तसं करण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही. शिवाय हल्लीच उघड झालेल्या अहवालात गोव्याच्या पाण्यात उच्च पातळीचे मायक्रोप्लास्टिक्स असल्याचं समोर आलंय, ही बाब नाईकांनी निदर्षनास आणून दिली.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | WATER SHORTAGE | एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!