शिक्षण क्षेत्रातील वारसा जपण्यास सावंत सरकार अपयशी…

प्रतिमा कुतिन्हों ; बंद पडलेल्या सरकारी शाळा सुरू कराव्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सरकारी शाळांच विलीनीकरण करून सरकार अच्छे दिन दाखवतंय का, असा सवाल ‘आप’च्या नेत्या प्रतिमा कुतिन्होंनी केलाय. सरकारी शाळांचं विलीनीकरण न करता बंद पडलेल्या सरकारी शाळा सुरू कराव्यात असा सल्लाही कुतिन्होंनी सरकारला दिलाय.
हेही वाचा:पोगो बिलाविषयी रेजीनाल्ड यांनी विधानसभेत केलेले विधान खोटे : मनोज परब

सरकारवर हल्लाबोल

‘आप’च्या नेत्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी डॉ. सावंत सरकारवर सरकारी शाळांच्या विलीनीकरणावरून हल्लाबोल केला. यावेळी आपचे उपाध्यक्ष रामराव वाघ पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
हेही वाचा:सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या शाळेच्या विलिनीकरणास विरोध…

शाळांचे जवळच्या शाळेत विलिनीकरण करणार

यावेळी ॲड. कुतिन्हो पुढे म्हणाल्या, पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत तब्बल २९४ सरकारी शाळांचे विलिनीकरण जवळच्या शाळेत करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. याशिवाय राज्यातील अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी किमान एक अंगणवाडी सरकारी व अनुदानित संस्थांनी दत्तक घ्यावी असे आवाहन शिक्षण खात्याने परिपत्रकाव्दारे केले आहे. या निर्णयामुळे सावंत सरकारने कॅग अहवाल, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे रिपोर्ट, युनेस्कोचा स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट यासारख्या अहवालावर गांभिर्याने विचार न केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात नमूद केलेल्या मुद्द्यांवर काम करण्याऐवजी मुख्यमंत्री सावंत एक शिक्षकी सरकारी शाळांचे विलीनीकरण करून आणि अंगणवाड्यांची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळांकडे सोपवू पाहत आहे. राज्यातील तरूणांचे भविष्य घडवण्यापेक्षा सावंत यांना भूतकाळातील मुद्दे उकरून काढण्यात अधिक रस आहे, अशी टीका ‘आप’च्या नेत्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.
हेही वाचा:रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणारी याचिका खंडपीठाने फेटाळली…

अंगणवाडीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार असमर्थ

एकीकडे शाळांमध्ये शिक्षक आणि संसाधनांच्या कमतरतेचा त्रास होत आहे तर दुसरीकडे सेवेत सरकारने काम करावे ही मागणी घेऊन पॅरा-शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी शिक्षकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते. सावंत सरकार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊ शकले नाहीच, उलट त्यांच्यावर शिक्षणाशी संबंधित नसलेल्या अतिरिक्त सरकारी कर्तव्यांचा भार सरकारने टाकला. अंगणवाडीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी असमर्थ असलेले सरकार स्वतःची जबाबदारी झटकू पाहत आहे, असे कुतिन्हो म्हणाल्या.
हेही वाचा:काजू फेणी, खोला, हरमल मिरची, खाज्यांना हवी गोमंतकीयांची ‘मते’, वाचा सविस्तर…

सायबरेज स्कीम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

आज एकीकडे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली शिक्षण मॉडेलची प्रशंसा केली जात आहे. तर दुसरीकडे सावंत सरकारच्या काळात राज्यातील 23 शाळा बंद पडल्या. गोवा मुक्तीनंतर पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी वाड्या-वाड्यावर शाळा योजना राबवली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सायबरेज स्कीम राज्यातील कित्येक विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरले. पर्रीकर यांच्या सायबरेज स्कीमकडे बोट दाखवणारे मुख्यमंत्री सावंत आज स्वतः शिक्षण क्षेत्रात नापास झाले आहेत, असे आपचे उपाध्यक्ष रामराव वाघ म्हणाले.
हेही वाचा:स्टेशनरी दुकानाआड व्हायची गुटखा व सिगारेटची विक्री, मात्र…

निधीचे वाटप करण्यात सरकार अयशस्वी

भाजप सरकारचा सुशेगातपणा आणि आर्थिक दिवाळखोरी कॅगच्या अहवालात ठळकपणे दिसून आले आहे. 2015 ते 2020 पर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी योजना तयार करण्यात आणि योग्यरित्या अंदाजपत्रक निश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कॅगने राज्य सरकारची निंदा केली आहे. केंद्र सरकारच्या निधीच्या सहाय्याने राज्यातील शिक्षणाची स्थिती सुधारण्यात आली असती मात्र, ते ही हातातून गेले, असे वाघ म्हणाले. वाघ म्हणाले की सावंत सरकार केवळ समग्र शिक्षा अभियानासाठी निधीचे वाटप करण्यात अयशस्वी ठरले नाही तर त्यांनी शाळांच्या देखभालीसाठीचे बजेट 20 कोटींवरून 30 लाखांपर्यंत कमी केले.
हेही वाचा:शाळा विलिनीकरणास पालकांचा विरोध…

येत्या काही वर्षांत शाळांची संख्या कमी होणार

राज्यात पूर्वी अस्तित्वात असलेल्या एक हजार पेक्षा जास्त प्राथमिक शाळांपैकी आता फक्त सातशे प्राथमिक सरकारी शाळा शिल्लक आहेत. २९४ शाळांच्या विलीनीकरणाच्या निर्णयामुळे येत्या काही वर्षांत सरकारी प्राथमिक शाळांची संख्या कमी होणार आहे. भाजप सरकारने यापूर्वीच अनेक क्षेत्रांमध्ये खाजगीकरणाचा कल प्रस्थापित केला आहे आणि आता ते शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे, असा आरोप वाघ यांनी केला.
हेही वाचा:३१ मद्यपी चालकांना खाकीचा दणका, परवाने जप्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!