सावंत सरकारकडून नेहमीच खाण अवलंबितांना मनस्ताप : आप

खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारने सध्याच्या खाण पट्ट्यांचे नूतनीकरण करण्याच्या केलेल्या असफल प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘आप’चे संयोजक राहुल म्हांबरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या या कारभारामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासळून खाण अवलंबितांना वर्षानुवर्षे मनस्ताप सहन करावा लागल्याबद्दल सावंत सरकारवर म्हांबरे यांनी टीका केली आहे. खाण अवलंबितांना आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला भाजप सरकारच्या स्वार्थामुळे नुकसान झाले आहे, असे म्हांबरे म्हणाले.

दरम्यान, खाणप्रश्नी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे गोव्यातील खाण पट्ट्यांचा स्पर्धात्मक बोलीद्वारे लिलावासाठी पुष्टी मिळाली असल्याची प्रतिक्रिया आपने दिली.

आप खाण पट्टीतील मतदारसंघांसाठी मोहीम राबवेल

‘आप’ने नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधेयकाला जलद मंजुरी देण्याची विनंती केली. मात्र, हेतुपूर्वक हे विधेयक राजभवनात अडकवून ठेवत असल्याचा आरोप मयेचे आप नेते उपेंद्र गावकर यांनी केला. आम आदमी पक्षाने खाण अवलंबिताना आधीच संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या कुटनीतीचा पर्दाफाश करण्यासाठी आप खाण पट्टीतील मतदारसंघांसाठी मोहीम राबवेल, अशी माहिती आपचे नेते गौरीशा गावकर यांनी दिली.

… तर खाणी सुरू झाल्या असत्या

राज्याच्या हितासाठी राज्य सरकारने खाण महामंडळ स्थापन केले असते तर खाणी सुरू झाल्या असत्या. आताही, जीएमडीसी विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर सावंत सरकार टाळाटाळ करत आहेत. ते राज्यपालांकडे या बिलासंदर्भात का पाठपुरावा करत नाही? असं ‘आप’चे मयेचे नेते उपेंद्र गावकर यांनी म्हटलं.     

हा व्हिडिओ पहाः CONGRESS | माजी फुटबॉलपटू अल्वितो डिकुन्हा काँग्रेसमध्ये

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!