विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: येथील प्रसिद्ध मेरी इमॅक्युलेट चर्चजवळील विहिरीत तोल जाऊन पडलेल्या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. ही घटना गुरुवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विहिरीत पडलेल्या युवकाचं नाव बर्नार्ड थॉमस असं असून तो आसामचा आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना सांगितली आहे.
तोल जाऊल विहिरीत पडला
हा युवक त्या विहिरीच्या काठावर बसला असता तोल जाऊन तो विहिरीत पडला. पाण्यात पडल्यावर तो तेथे असलेल्या एका दोरीला पकडून खूप वेळ लटकत होता. या घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीत शिडी सोडून त्याला बाहेर काढलं.
पणजी पोलिसांनी युवकाला पोलिस स्थानकात आणलं
पणजी पोलिसांनी या युवकाला पोलिस स्थानकात आणलं. तोल गेल्यानं तो विहिरीत पडल्याचं त्याने सांगितलं. मात्र, ही विहीर अडगळीच्या ठिकाणी आहे आणि त्यातील पाण्याचा कोणीही वापर करत नाही. ती चर्चच्या बाजूलाच असल्यानं तिथे येणारे पर्यटक पाण्याच्या बाटल्या त्यातच टाकत असल्यानं त्यात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे.