गोव्याचं वैभव वाचवा! ओल्ड गोवा चर्चजवळील बांधकामाला तीव्र विरोध

नारायण गवस | प्रतिनिधी
पणजी : ओल्ड गोवा चर्चजवळ होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात रविवारी राज्यातील विविध संघटनांच्या सदस्यांनी रॅली काढली. ओल्ड गोवा वारसास्थळाच्या ठिकाणी होत असलेले हे बेकायदेशीर बांधकाम पाडावं, अन्यथा राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन हे बांधकाम पाडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. गेला महिनाभर या बांधकामाला विविध संघटनांकडून विरोध केला जातोय. अनेक वेळा या ठिकाणी रॅली काढण्यात आल्या आहेत. रविवारी मात्र राज्यातील मोठ्या प्रमाणात युवकांनी या रॅलीत सहभाग दर्शविला. विविध संघटनांनी या वेळी रॅलीत सहभागी होत पाठिंबा दिलाय.

का होतोय विरोध?
ओल्ड गोवा येथील चर्च ही जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे. ही जाग भारतीय पुरातन खात्याअंर्गत येत आहे. असं असतानाही या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम केले जात आहे. बांधकामासाठी लागणारे सर्व परवाने स्थानिक पंचायत तसेच इतर सरकारी कार्यालयाकडून घेतली जात आहे. हे परवाने पूर्णपणे खोटे असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैशाच्या जोरावर हे सर्व परवाने घेतल्याचं बोललं जातंय. ओल्ड गोवा हे वारसा स्थळ आहे आणि वारसा स्थळाच्या ठिकाणी असे बांधकाम करता येत नाही. हे बफर झोनच्या अंतर्गत येते. वारसा स्थळांच्या १ किलोमीटरपर्यंत कुठलेच बांधकाम करता येत नाही. तरी पण हे बांधकाम अगदी चर्चजवळ केले जात आहे. याला सर्व गोमंतकीयांचा विरोध आहे. आम्ही कुठल्याचा परिस्थिीतीत या ठिकाणी बेकायदशिर बांधकाम करायला देणार नाही, असे गोवा हेरीटेज ग्रुपचे प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.
हेही वाचा : ऑक्सिजन मृत्यूच्या मुद्द्यावर भाजप सरकार स्वतःच्याच खोट्या जाळ्यात अडकलं

आज गोव्याीतील वारसा स्थळांच्या जागावर बाहेरील बिल्डर ताबा मिळवतायत. गोव्यातील सर्व जागा बिल्डरांनी घेतल्यात. आता वारसा स्थळाजवळही अवैध बांधकाम केले जात आहे. त्यांना स्थानिक पंचायतींचं सहकार्य मिळत असल्यानं अशी बेकायदेशीर बांधकामे केली जात आहेत. पैशाच्या जोरावर पंचायतीना खरेदी करुन बिल्डर अशी बांधकामे करत आहे. ओल्ड गोवा चर्च ही गोव्याचा एकमेव असे जागतिक वारसा स्थळाचे ठिकाण आहे. या ठिकाणी असे बेकायदेशिर बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. याच्या विरोधात सर्व संघटना एकत्र आलेल्या आहे. सरकारने हे बांधकाम पाडावे अन्यथा आम्ही सर्व संघटना मिळून हे बांधकाम पाडणार आहे, असे यावेळी गोंयचो आवाज संघटनचे अॅड. संतोष तारी यांनी सांगितले.
हेही वाचा : देर आए दुरुस्त आए! गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्गच्या गाड्यांना अखेर मुभा