“गोव्याच्या नद्या वाचवा”; मोटरसायकल रॅली व “जेटी धोरण” निदर्शनात काँग्रेस नेते सहभागी…

मोटरसायकल रॅलीत अमित पाटकर सहभागी : युरी आलेमाव "जेटी धोरण" विरोधातील निदर्शनात सहभागी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी गोव्यातील नद्या वाचविण्यासाठी सरकारच्या जेटी धोरणाला विरोध करणाऱ्या “मोटरसायकल रॅलीत भाग घेतला. यावेळी “गोव्याच्या नद्या वाचवा” अशा घोषणा देत शेकडो दुचाकीस्वारांसह शिरोडा ते पणजी असा प्रवास काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी “जेटी धोरण” विरोधात निदर्शनात भाग घेतला.
हेही वाचाःNew Year 2023: नव्या २०२३ वर्षांत असणार ‘इतक्या’ सुट्ट्या, जाणून घ्या…

कॅप्टन ऑफ पोर्टसला जेटी धोरण हाताळू द्या

गोव्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना युरी आलेमाव म्हणाले, “जेटी धोरण गोव्याचे कोळसा हब आणि जुगाराच्या अड्ड्यात रूपांतर करेल. भाजप सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी प्रथम सुमारे ५ कोटी खर्च करुन तयार केलेल्या “कॉपी पेस्ट” गोवा पर्यटन धोरण आणि मास्टर प्लॅनचे” पुनरावलोकन करावे. कॅप्टन ऑफ पोर्टसला जेटी धोरण हाताळू द्या असे त्यांनी सांगितले.
हेही वाचाःदक्षिण कोरिया : चेंगराचेंगरीत १५१ जणांचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!