सत्तरीला वादळी पावसाचा तडाखा

देविदास गावकर | प्रतिनिधी
वाळपई : सत्तरी तालुक्यातील सावर्डे आणि नगरगांव पंचायत क्षेत्रातील धारखंड, कुडशे, तार, धावे, माळोली आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. सोमवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या वादळात मोठमोठी झाडं, विजेचे खांब कोसळले. बागायतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वाळपई पालिका क्षेत्रातील वेळूस गावातील अनेक घरांमधील टीव्ही, फ्रिज निकामी झाले. विजेचा दाब वाढल्यानं हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाल. बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गावांत वीज आणि मोबाईल नेटवर्कही गायब झालंय.
अग्निशामक दलाकडून प्रयत्नांची शर्थ
दरम्यान, अग्निशामक दलानं प्रयत्नांची शर्थ करत काही भागांत वीज पुरवठा सुरळीत केला. झाडं हटवण्याचं काम मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होतं. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सत्तरीत आकाशात ढग दाटल्यानं अंधारून आलं. रात्री पावसासह वादळी वार्यांचीही शक्यता असल्यानं बागायतदार धास्तावलेत.