खोतोडा प्रीमियर लीगमध्ये सातेरी स्ट्रायकरचा विजय

६ गडी राखून विजय प्राप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः खोतोडा येथील मैदानावर आयोजित केलेल्या चौथ्या खोतोडा प्रीमियर लीग स्पर्धेत सातेरी स्ट्रायकर संघाने महालासा बॉईज संघाचा ६ गडी राखून विजय प्राप्त केला. स्पर्धेत सामना वीर म्हणून तुषार साळकर तर मालिका वीर म्हणून सुनील गावकर यांना बक्षिसं देऊन गौरविण्यात आलं. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते. साई स्पोर्ट्स संघाला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं.

३ षटकात ४ बाद ६७ धावा

अंतिम सामन्यात महलासा बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करून ६ षटकात ९ बाद ६१ धाव केल्या. प्रत्युत्तरात सातेरी स्ट्रायकर संघाने ३ षटकात ४ बाद ६७ धावा करून सहज विजय प्राप्त केला. विजयासाठी एका धावाची गरज असताना तुषार साळकर यांनी षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

विविध बक्षिसांचे मानकरी

स्पर्धेत उत्कृष्ट संघ म्हणून शेळप क्रिकेटर संघ, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सचीत म्हाऊसकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून उमेश साळकर यांना खास बक्षीस देण्यात आली. तसेच ज्येष्ठ खेळाडू म्हणून कृष्णनाथ मावलींगकर यांना बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळी केलेल्या शंकर गावकर, शैलेश गावकर इमर्गिंग प्लेअर व सर्वाधिक षटकात खेचलेल्या महादेव म्हाळ शेकार खास बक्षीस देण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!