सासष्टीत पंचायत निवडणूक शांततेत…

चिंताजनक मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : सासष्टी तालुक्यातील नावेली मतदारसंघातील दवर्ली येथील हाऊसिंग बोर्डमधील चार केंद्रे ही चिंताजनक जाहीर करण्यात आली होती. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्रानजीक कुणालाही उभे राहण्यास पोलीस देत नव्हते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनीही उपअधीक्षकांसह हाऊसिंग परिसरातील चिंताजनक केंद्रावर भेट देत पाहणी केली. सासष्टीत निवडणूक प्रक्रिया गडबड गोंधळाशिवाय पार पडली. सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त होता. चिंताजनक केंद्रांनजीक मतदारांना गाड्या पार्क करण्यास मनाई केली होती. सुमारे १०० मीटर अंतरावर उमेदवार व त्यांच्या समर्थकांना राहण्यास सांगण्यात आले होते.
हेही वाचा:Panchayat Election | कळंगुट प्रभाग ९ मध्ये आज मतदान, कारण…

मटिल्डा डिसिल्वा ‘आप’पासून दूर

आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढलेली आहे. कोणत्याही पक्षाने आपणास पाठिंबा दिलेला नाही. पक्षाने पाठिंबा दिला असता तर आपण तो घेतला असता. मात्र तसे झालेले नाही. तळावलीतून निवडणूक लढत असलेल्या उमेदवार मटिल्डा डिसिल्वा यांनी आम आदमी पक्षानेही साथ दिली नाही, असे सांगत आपपासून दूर गेल्याचेच संकेत दिले. मटिल्डा यांनी जिल्हा पंचायत निवडणूक आम आदमी पक्षाकडून लढवली होती.
हेही वाचा:लोकशाही जपायला विसरू नकोस!

आमदारांचाही मतदान प्रक्रियेत सहभाग

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हाऊसिंग बोर्ड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. नावेलीत भाजपच्या समर्थक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:भाजपाशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ…

निकालानंतर कळणार लोक कुणासोबत : चर्चिल आलेमाव

बाणावलीतील सर्व पंचायती आपल्याकडे असतानाही ईव्हीएममुळे आपला पराभव झाला होता. पंचायत निवडणुकीत मुलगी शेरॉन रिंगणात आहे. याआधीच्या निवडणुकांवेळी माझ्या मुलीच प्रचारासाठी फिरत असतात. लोकांच्या पाठिंब्यावरच आपण निवडून आलो आहे. आता निकालानंतर स्पष्टच होईल की, भाजप, आप व आरजीचे किती समर्थक निवडून येतात व लोक कुणासोबत आहेत, असे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.
हेही वाचा:माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे अपघातात निधन…

निवडणूक पंचायतीची, टीका आमदारांवर

नुवे पंचायतीतून निवडून येऊन २५ वर्षे पूर्ण होत आहेत. सुमारे दीडशे कोटींचे प्रकल्प मंजूर केले होते. त्यातीलही ३० ते ४० कोटींचे प्रकल्प होणे बाकी आहेत. माजोर्डा महाविद्यालयानजीक मंजूर झालेल्या कामांसह साकव इतर कामे करण्यापासून सध्याचे आमदार ठेकेदारांना रोखत आहेत. नुवे परिसरातील तीन ते चार कोटींची मंजूर रस्त्यांची कामेही आमदार आलेक्स सिक्वेरा ठेकेदाराला करू देत नाहीत, असा आरोप माजी आमदार विल्फेड डिसा यांनी केला.
हेही वाचा:आरबीआयचा गोव्यातील एका बँकेला ‘दणका’, वाचा सविस्तर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!