सर्वण कारापूर पंचायत परिसरात ५ दिवस लॉकडाऊन

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोली : सर्वण कारापूर पंचायत विभागात बुधवार ते रविवार असा ५ दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय पंचायत बैठकीत घेण्यात आलाय. याची माहिती सरपंच गोकुळदास सावंत यांनी दिली आहे.

लॉकडाऊन काळात दूध, भाजीपाला, भुसारी दुकाने सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंतच चालू असतील. बाकी सर्व व्यवहार बंद असतील असे सावंत यांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी मोक्याच्या ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करून परिसर सेनीटाईझ करण्यात आलाय. यात शाळा, बसशेड, मंदिर, दुकाने आणि काही घरांचा समावेश आहे. या कामावेळी सर्व पंचायत सदस्य तसेच सीताराम सावंत उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात मंगळवारी अनेक पंचायतींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना फक्त वगळण्यात आलं आहे. दरम्यान, आता कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभरात स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लावले जात असल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा – ‘लॉकडाऊन न्हू’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही गावं का निर्णय घेत आहेत?
हेही वाचा –
दोडामार्गमध्ये होणार कडक लॉकडाऊन!
LOCKDOWN | मांद्रे पंचायतीकडून सेल्फ लॉकडाऊन जाहीर
गोव्यात 10 ते 15 दिवस कडक लॉकडाऊन कराच