पंचवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा रिव्होल्यूशनरी गोवन्सने केला पर्दाफाश

संरपंचांनी संरक्षक भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः रिव्होल्यूशनरी गोवन्स नेहमीच बेकायदेशीर प्रकारांच्या विरोधात उभे राहिलेत. बेकायदेशीर प्रकारांचा पर्दाफाश करणं हे रिव्होल्यूशनरी गोवन्सने नेहमीच कायदेशीर पद्धतीने केलेलं एक ग्राउंड लेव्हल वर्क असल्याचं रिव्होल्यूशनरी गोवन्सचे सदस्य विश्वेश नाईक आणि गौरेश गावकर म्हणाले. रिव्होल्यूशनरी गोवन्सतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. बेकायदेशीर प्रकार तसंच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या रिव्होल्यूशनरी गोवन्सने पंचवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंचाचा पर्दाफाश केलाय. पंचवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंचाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप रिव्होल्यूशनरी गोवन्सकडून करण्यात आलाय.

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

संरक्षक भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार

रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेनुसार, पंचवाडी ग्रामपंचायतीकडून २०१५-२०१६ च्या आरटीआय आकडेवारीतून मिळालेल्या निविदांच्या यादीनुसार, एका टेंडरमध्ये करारावर पीडब्ल्यूडीची निविदा सूचीबद्ध करण्यात आली होती, ज्यातील एका निविदेनुसार जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ एक संरक्षक भिंत बांधण्यात येणार होती. निविदेतील रक्कम १,४२,०८,२६/- होती. पंचवाडीचे विद्यमान सरपंच क्रिस्टियो डिकॉस्टा यांना कंत्राट देण्यात आलेलं. सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांत काम पूर्ण झालं आणि ग्रामपंचायतीकडे बिलं सादर करण्यात आली.

हेही वाचाः ‘कायद्यांमध्ये दुरुस्ती करून खाणी सुरू करा’

०६ ऑक्टोबर रोजी जागरुकता आणि भ्रष्टाचारविरोधी तक्रार दाखल

रिव्होल्यूशनरी गोवन्सने ०६ ऑक्टोबर रोजी जागरुकता आणि भ्रष्टाचारविरोधी तक्रार दाखल केली होती, पण आतापर्यंत या तक्रारीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही तक्रार विविध कार्यालयांकडे पाठवण्यात आली आहे, पण अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. रिव्होल्यूशनरी गोवन्सला संशय आहे की, उच्च पदावरील अधिकारी यात सहभागी आहेत आणि त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येत नाहीये. त्यांना फक्त तपासणी करायची आहे आणि सरपंचाला अपात्र ठरवायचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!