मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंतांना “आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर…

8 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांना कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र पुरस्कार वितरण महासंघाचा “आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर झाला आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट बेळगाव व हेल्थ ॲड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावतर्फे आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा 8 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
हेही वाचाःकेरळमध्ये बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी…

अनेक वर्षे ॲड. सावंत सामाजिक क्षेत्रात कार्यरत

श्री भूमिका युवा मंडळ सावंतवाडा मांद्रे या संस्थेचे सचिव म्हणून सामाजिक चळवळ सुरू करून गेली अनेक वर्षे ॲड. अमित सावंत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे संचालक, गोवा शुटींग बॉल संघटनेचे अध्यक्ष, श्री ओंकार थिएटर्स पेडणे संस्थेचे अध्यक्ष, श्री. देवी भूमिका देवस्थान मांद्रेचे अध्यक्ष अशा अनेक सामाजिक संघटनांशी कार्यरत असून ते योग्य न्याय देत आहेत.
हेही वाचाःविजयादशमीला सुरक्षा दलाला मोठे ‘यश’…

अनेक क्षेत्रात त्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली

नेहरू युवा केंद्र भारत सरकार, एनसीसी, युवा रेड क्रॉस अशा अनेक क्षेत्रात त्यांनी अग्रेसर तथा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. ०५ सप्टेंबरला शिक्षक दिन निमित्ताने कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक व्यक्तींचा कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र पुरस्कार वितरण महासंघातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सदर सोहळा ०८ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचाःCM ON HOUSE LAND OWNERSHIP : सरकारी जमिनीतील घरांच्या मालकीबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान, वाचा सविस्तर…

ॲड. अमित सावंत यांचे सर्वत्र कौतूक

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, इंजिनियरींग व डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्र गोल्डन ज्वेलरी व सहकार इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महनीय व्यक्तींचा सत्कार समारंभात समावेश आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार आंतरराज्य गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व केंद्रीय मंत्र्यांकडून अभिनंदन पत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असे सदर पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. कार्यक्रम भव्यदिव्य असून अनेक जिल्ह्यांचे पोलिस प्रमुख एस.पी., मंत्री, खासदार, आमदार, सैन्यदलाचे उच्च अधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सदर प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याने मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांचे सर्वत्र कौतूक होत असून त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली जात आहे.
हेही वाचाःअंबानी परिवाराला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!