प्रबोधन शिक्षण संस्थेत संस्कृत दिन उत्साहात

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी असून आजच्या या विज्ञानयुगात तर या संस्कृत भाषेचं शिक्षण घेण्याकडे लोकांचा मोठा कल वाढलेला दिसतो. प्रत्येक वर्षी प्रबोधन शिक्षण संस्थेच्या संस्कृत प्रबोधिनीच्या वतीने संस्कृतदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही संस्कृतदिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ऑनलाइन पद्धतीने संस्कृतदिन साजरा करण्यात आला.
हेही वाचाः काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांची पर्तगाळ मठाला भेट; स्वामीजींचं दर्शन घेतलं
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संदीप मणेरीकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे एल.डी.सामंत मेमोरियल विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर, विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षिका मेघना देवारी, एल.डी.सामंत विद्यालयाचे संस्कृत शिक्षक काशिनाथ मोने आणि शाळेतील शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने झाली. मेघना देवारी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. दामोदर म्हार्दोळकर यांनी मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत केलं. संदीप मणेरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तद्नंतर विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं.
हेही वाचाः आम्ही मीटर बसवणार नाही, मोबाईल अॅप चालेल
विविध स्पर्धांचं आयोजन
संस्कृतदिनानिमित्त वेगवेगळ्या वर्गांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध पारितोषिके प्राप्त केली. संस्कृतदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे – प्राथमिक विभाग सुभाषित पठण स्पर्धा – प्रथम सारंग चोपडेकर, द्वितीय अभिनव चोडणकर, तृतीय रुद्रज रवींद्र भट.
हेही वाचाः गोंयकारांनी कर्नाटक आणि केरळमध्ये रा. स्व. संघाचा पाया घातला
चित्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम श्रीरंग सुरेश दळवी, द्वितीय किमया नारायण कवळेकर, तृतीय सुजित उत्तम कोरगावकर.
गृहवस्तूचित्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम निलभ गुरुदत्त देवारी, द्वितीय एकनाथ प्रदीप शिरोडकर, तृतीय कांचन उत्तम कोरगावकर.
योग्यरुपलेखन प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम निखिल राजेश सरमळकर, द्वितीय योगीराज रामनाथ पै, तृतीय अभिनव अमरेश मणेरीकर.
कारकप्रकरण प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम मधुरा हरीश सावंत, द्वितीय रणवीर राजन साळगावकर, तृतीय वेदांत सतीश खेटमालीस.
व्याकरण प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम श्रद्धा गोविंद शिरोडकर, द्वितीय संजाली सूरज सांब्राणीकर, तृतीय किर्ती मौर्य.
विद्या प्रबोधिनी उच्चमाध्यमिक विद्यालय निबंध स्पर्धा – प्रथम रजत राजेश सरमळकर, द्वितीय रिया गवस.
इयत्ता बारावी विज्ञान शाखा निबंध स्पर्धा – प्रथम शुभांगी फडते, द्वितीय आदिती आडपईकर.
संस्कृत सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा – प्रथम रजत सरमळकर, द्वितीय देवश्री दळवी, तृतीय चैताली आजगावकर.
हेही वाचाः एक भलामोठा Thank You! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..
शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा
याचप्रमाणे शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषास्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम पृथ्वीराज कवठणकर, द्वितीय दीपा मणेरीकर, तृतीय कीर्ती सावईकर तसंच समीरा येडवे यांना पारितोषिकं प्राप्त झाली. यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ मोने यांनी केलं. स्पर्धेचा निकाल सुदिन भट यांनी जाहीर केला. तसंच नरेंद्र जोशी यांनी अभारप्रदर्शन केलं. शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पृथ्वीराज कवठणकर, पंकज पालयेकर तसंच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहाय्य लाभलं.