संजीवनी साखर कारखाना सुरु करा, अभ्यास समितीची सरकारला शिफासर

एड. नरेंद्र सावईकरांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी साखर कारखाना अभ्यास समितीने  मुख्यमंत्र्यांना सोमवारी अहवाल सादर केला.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: संजीवनी साखर कारखाना अभ्यास समितीने मुख्यमंत्र्यांना सोमवारी अहवाल सादर केला. या अहवालात साखर कारखान लवकरात लवकर सुरु करण्याची शिफारस करताना काही आवश्यक सुधारणाही सुचविल्या आहेत. अहवालाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेवेळी समितीचे अध्यक्ष माजी खासदार एड. नरेंद्र सावईकरांसहीत माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, आयतीन मास्कारेन्हस, हर्षद प्रभुदेसाई आणि सतीश तेंडूलकर हे इतर सदस्य उपस्थित होते.

समितीने अहवालात केलेल्या काही महत्वाच्या शिफासरी खालील प्रमाणे

  • कृषी खात्याला संजीवनी साखर कारखान्याला बळकटी देण्याचे काम सोपवावे
  • ऊसाचे उच्च उत्पादन देणारे बियाणे व प्रात्यक्षिक भूखंड त्वरित विकसित करावा. जेणेकरून ऑक्टोबर / नोव्हेंबर 2021 पर्यंत विद्यमान व संभाव्य ऊस उत्पादकांना बियाणे उपलब्ध होऊ शकेल
  • डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन आणि गुळ संशोधन केंद्र, संकेश्वर या तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून इथॅनॉल आणि सेंद्रिय गुळासारख्या नवीन उदयोन्मुख संकल्पनांसाठी तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करवा जेणेकरुन उसाची लागवड अधिक फायदेशीर ठरू शकेल.
  • डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, पुणे यासारख्या तज्ञ संस्थेच्या माध्यामातून कारखानाच्या आधुनिकीकरणाबाबात सुधार करण्यासाठीआणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. फेब्रुवारी 2021 पर्यंत तज्ञ संस्थांनी या संदर्भात अहवाल सादर करावा.

चर्चेदरम्यान मा. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, प्रतिटन रु.600 लवकरच वितरीत केले जातील. नुकसान भरपाईसाठी ऊसाचे मूल्यांकन करण्यासारखे आधीच ठरले आहे ते मुल्यांकन करुन ती रक्कम ऊस उत्पादकांना ते देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे संजीवनी साखर कारखाना अभ्यास समितीचे अध्यक्ष एड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!