संदीप वझरकर यांची जामिनावर सुटका

पर्वरी पोलिसांकडून डेहराडून न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : सुकूरचे माजी सरपंच तथा तृणमूल काँग्रेसचे नेते संदीप वझरकर यांना पर्वरी पोलिसांनी डेहराडून न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री अटक केली. मात्र हा जामीनपात्र गुन्हा असल्याने त्यांची जामिनावर सुटका केली.

हेही वाचाः माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर…

जामिनावर सुटका

‘बँक चेक’ बाऊन्स झाल्याप्रकरणी डेहराडून न्यायालयाने कलम १३८ खाली वझरकर यांना अटक करण्याचा आदेश गोवा पोलिसांना दिला होता. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी वझरकर यांना अटक केली होती. हा जामीनपात्र गुन्हा असल्याने वझरकर यांची न्यायालयाने १० हजारांच्या वैयक्तिक हमीवर सुटका केली.

हेही वाचाः मुलींना चुलत भावांपेक्षा जास्त मालमत्ता मिळणार…

हे आहेत त्यांच्यावर आरोप

दरम्यान, संदीप वझरकर यांनी भाजपला सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलनेही त्यांना निवडणूक ‌रिंगणात उतरवले आहे. यापूर्वी बुधवार, २९ डिसेंबर २०२१ रोजी रात्रीच्या वेळी सेरुला कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी वझरकर यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. सुकूर गावातील ७,९७५ चौरसमीटर जमीन संशयित वझरकर व त्यांच्या कुटुंबीयांनी फसवणूक करून मिळवली, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबद्दल सेरूला कोमुनिदादचे अध्यक्ष अ‍ॅलेक्स डिसोझा व समितीच्या सदस्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा अटक झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!