कामुर्लीत ट्रकसह रेती जप्त

बुधवारी संध्याकाळी 3.15 च्या सुमारास कारवाई; कोलवाळ पोलिसांकडून ट्रक जप्त

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: कामुर्ली फेरी धक्क्याजवळ ट्रकमध्ये ठेवण्यात आलेली 5 घनमीटर वाळू कोलवाळ पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी 3.15 च्या सुमारास पोलिसांनी केली.

हेही वाचाः साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास ठराव

कामुर्ली फेरी धक्क्याजवळ कारवाई

कामुर्ली फेरी धक्क्याजवळ एका ट्रकमध्ये नदीतून उत्खनन केलेली रेती ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे हवालदार महादेव परब आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घटनास्थळी एक रेती भरलेला ट्रक सापडला.

हेही वाचाः वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के

5 घन मीटर रेती जप्त

सदर ट्रकमध्ये 5 घन मीटर रेती होती. ती रेती पोलिसांनी ट्रकसह जप्त केली. तसंच ट्रकावरील दोघा कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

हेही वाचाः ACCIDENT | धारगळ जंक्शनवर ट्रक – दुचाकीचा अपघात

हा व्हिडिओ पहाः Video | FLOOD | सत्तरीवासीयांना अद्याप भरपाईचीच प्रतीक्षा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!