साईंच्या पालखीचं शुक्रवारी बांद्यात स्वागत

गाेमंतक साई सेवक गाेवातर्फे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गाेमंतक साई सेवक आयाेजित गाेवा ते शिर्डी पदयाञेचे आयाेजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 7 जानेवारीपासुन राष्ट्राेऴी साईबाबा मंदिर सांगोल्डा येथुन प्रस्थान झाले. शुक्रवार 8 जानेवारी राेजी बांदा येथील साईमठामध्ये पदयात्रा पोहोचणार आहे.

22 जानेवारी रोजी दुपारी 2 पर्यंत पदयात्रा शिर्डीला पाेहचणार आहे. शुक्रवार 8 जानेवारी राेजी आऴवाडा-बांदा येथील साईमठामध्ये या पदयाञेचे सकाऴी 11 वाजता आगमन हाेणार आहे. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने पदयाञेत सहभागी साईभक्ताचे भव्य स्वागत केले जाणार आहे. दुपारी 12 वाजता साईमठामधे साईंची आरती केली जाणार आहे.

काेराेना महामारीमुळे शासकीय नियमाचे पालन करून साेशल डिस्टंसिंग ठेवुन ही पदयाञा पुर्ण केली जाणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!