“सचिनचा सहवास, देवाची अनोखी भेट” गोव्याचा मच्छीमार पेले याचे उद्गार…

काही दिवसांपूर्वी सचिन तेंडूलकर आणि पेलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : सचिन तेंडुलकर गोवा ट्रिपचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतोय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गोव्यात आपल्या फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने गोव्यात मासे पकडतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्याने मासेमारी करणारा मच्छीमार पेले सोबतचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये मासे खातानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सागर देसाई यांनी पेले यांच्याशी फोनवर साधलेला संवाद 

सागर देसाई – तुझा जो सचिन तेंडुलकर सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला, तो अख्ख्या जगभर व्हायरल झालाय.

पेले – व्हायरल होऊ दे रे बाबा… निदान आम्हा गोंयकार नुस्तेकारांना (मच्छिमार) त्यानिमित्त्यानं प्रसिद्धी तरी मिळेल.

पेलेशी संवाद साधताना सचिन तेंडूलकर

सागर देसाई – तू ज्या पद्धतीने त्याच्याकडे संवाद साधत होतास, त्यातून सचिन खूपच प्रभावीत वाटत होता. तुझ्या बरोबर संवाद साधून तो खूप आनंदी वाटत होता. तू जेव्हा त्याला म्हणत होतास जगातला सर्वोच्च खेळाडू, तुझं त्याच्याशी बोलणं, त्याचा तुला मिळणारा प्रतिसाद, सगळंच खूप सुंदर…पण एवढ्या दूर तुझ्यापर्यंत सचिन पोहोचला तरी कसा….

पेले – त्याचं काय झालं, सचिन ताजमध्ये उतरला होता. ताजच्या खाली असलेल्या समुद्रकिनारी मी मासेमारी करतो. तो आणि त्याची बायको समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी आले असता मी त्याचं स्वागत केलं.

पेले – मी त्यांना सांगितलं, की मी एक गरीब मच्छिमार आहे. तुम्ही जेव्हा देशासाठी सेंच्युरी केली आणि वर्ल्डकपचे मानकरी ठरलात, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, पण जेवढे पैसे होते त्याचे मी फटाके आणून इथे आनंद साजरा केला. कारण तुम्ही देशाची मान अभिमानाने उंचावली. पण आज माझी एवढी ऐपत आहे, की माझ्या स्वतःच्या होडीने मी तुम्हाला मासेमारीसाठी घेऊन जाऊ शकतो.

सागर देसाई – अरे वाह.. तू तुझ्या होडीने त्यांना घेऊन गेलास….

पेले – काय सांगू तुला, माझ्या या शब्दांनी त्याची बायको एवढी खुश झाली म्हणून सांगू. सचिन म्हणला, की उद्या तू तयार राहा, आम्ही तुझ्यासोबत मासेमारीला येणार. त्यानंतर मी बोट स्टार्ट केली आणि मासे पकडून आणले आणि दुपारी १२ वाजता माझ्या छोट्या रेस्टॉरंटवर मासे भाजून देतो तुम्हाला असं म्हणालो. मी धावपळ करून बायको, वहिनीला बोलावून दुपारी १२ पर्यंत जेवण तयार केलं आणि रेशाद बांगडे त्यांना दिले. मग त्याच्या मुलाला विचारलं की तुला लिंबू सोडा हवा का? तर त्यांने आपल्याला नारळ पाणी हवं असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी लगेच गेलो आणि माझ्या स्टाईलमध्ये आडसरं पाडली आणि त्याला नारळ पाणी दिलं. तो खूप खुश झाला. त्यावर तो म्हणला की हेच खरं मच्छिमाराचं आयुष्य… असं म्हणत त्यानेच हा व्हिडिओ काढला.

सागर देसाई – त्याने तुझा पूर्ण जगात व्हिडिओ व्हायरल केलाय, माहीतीए तुला?

पेले – त्याने मच्छिमारांसोबत थोडा वेळ घालवला, यातून तो अजून मोठा झाला.

सागर देसाई – तो मुंबईहून स्वतःची गाडी घेऊन आला होता, माहीतीए तुला?

पेले – हो माहीत आहे… आमच्यासाठी ही देवाची मोठी भेटच आहे….

सागर देसाई – चल, बाय, भेटतो तुला एक दिवस…..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!