देशाच्या रक्षणासाठी सैनिकांचा त्याग लाखमोलाचा

निवृत्त सेनानी रुपेश भाईडकर यांचे उद्गार

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

पेडणे : 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी प्राथमिक शाळा भटवाडी कोरगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी निवृत्त सेनानी रुपेश भाईडकर, मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर, प्रवक्ते राजू नर्से, मुख्याध्यापिका जोशना नाईक शिक्षिका संजिवनी नर्से उपस्थित होत्या.

सैनिक भारतवासी यांच्या रक्षणासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. दोन वेळच्या अन्नाची पर्वा न करता उपाशीपोटी सीमेवर कार्य करत आहेत, असे अनुभव निवृत्त सेनानी रुपेश भाईडकर यांनी यावेळी सांगितले. घरदार सोडून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कार्यरत असलेले सैनिक परत घरी सुखरुप पोचतील याची शाश्वती नाही. पण घेतलेला दिवस देशासाठी असं म्हणून जगणारे सैनिक अभिमानास्पद कार्य करतात, असे रुपेश यांनी म्हटले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त रुपेश भाईडकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले याचा आम्हाला विशेष आनंद आहे. भारतीय सैन्यात मोलाचे काम करणारा रुपेश हा आमच्या कोरगाव गावातला याचा आम्हाला अभिमान आहे. यांच्यासारख्या विरांमुळे आम्ही दोन वेळचे अन्न खाऊ शकतो आणि निवांत झोप घेऊ शकतो. या युद्धात अहोरात्र मेहनत करणारे सैनिक आपल्या प्राणाची आहुती सुद्धा देऊन बसतात, त्या सगळ्या वीरांना मानाचा सलाम, असे मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी म्हटले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!