सचिन परब यांची मतदारांना अनोखी भेट

दोन लाख रुपयांचे अपघाती विमा कवच - इस्पितळातील देखभालीसाठी एक लाख रुपये

Goan Varta Live | प्रतिनिधी

हरमल: मांद्रे मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते सचिन परब यांनी मतदारांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये विमा कवच आणि हस्पिटलातील देखभालीच्या खर्च रूपात एक लाख रुपयांचा लाभ देऊन अनोखी भेट दिली आहे.

हेही वाचाः पावसाची विश्रांती; गणेश चतुर्थीच्या उत्साहाला उधाण

मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली माहिती

याबाबत मंगळवारी आपल्या निवासस्थानी सचिन परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस कार्यकर्ते अरुण वस्त, सूरज रेडकर, देवेंद्र तळकर व बजाज इन्शुरन्सचे सुप्रेश लिंगुडकर उपस्थित होते.

१८ वर्षांवरील व ६० वर्षांखालील मतदारांना घेता येणार योजनेचा लाभ

या विमा कवचद्वारे पायलट, रिक्षा, वीज खात्याचे लाईनमन, पाडेली, समुद्रात जाणारे मच्छिमार आणि कष्ठाची कामं करणाऱ्यांना तसंच व्यावसायिकांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. याअंतर्गत लाभार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला दोन लाखांची विमा रक्कम त्यांच्या कुटुंबियांना मिळेल व इस्पितळात उपचारासाठी एक लाख रुपये असे या विम्याचे स्वरूप असेल. या योजनेचा लाभ १८ वर्षांवरील व ६० वर्षांखालील मतदारांना घेता येईल. मांद्रे मतदारसंघातील एक हजार लोकांना पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न आहे, असं परब यांनी सांगितलं. पेडणे तालुक्यातील पत्रकारांना पाच लाखांचा विमा आणि दोन लाख इस्पितळ खर्च असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेबाबत बजाज इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी सुप्रेश लिंगुडकर यांनी सविस्तर माहिती दिली.

या योजनेचे नूतनीकरण आणि अन्य सोपस्कार पूर्ण करण्याची जबाबदारी परब यांनी स्वीकारली आहे. चतुर्थीनंतर आवश्यक सोपस्कार पूर्ण केले जातील. त्यामुळे मांद्रे मतदारसंघातील मतदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, असं आवाहन परब यांनी केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः POLITICS| LOBO- पुन्हा एकदा मायकल लोबो राजकीय कृतीमुळे चर्चेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!