मांद्रे मतदारसंघातील कोविड रुग्णांच्या मदतीला धावले सचिन परब

होम आयझोलेशनमध्ये असणाऱ्यांना परबांकडून मोफत ऑक्सिजन पुरवठा

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

पेडणेः कोरोना व्हायरसच्या गंभीर रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते. मात्र अनेकदा ते उपलब्ध होत नाही आणि परिणामी रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. होम आयझोलेशनमध्ये असलेल्या अशाच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आलेत काँग्रेस ब्लॉक कमिटीचे सदस्य व समाजसेवक सचिन परब. गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवण्याचा त्यांनी विडा उचलला आहे.

पेडण्यातील कोरोना रुग्णांचा आधार बनले सचिन परब

राज्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्याच दरदिवशी समोर येणारी नवनवीन कोरोनाची प्रकरणं. या प्रकरणांचा आकडा हा चढाच आहे. त्याच ऑक्सिजन अभावी होणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ होतेय. मात्र मांद्रे मतदारसंघातीत होम आयझोलेशनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांचा सचिन परब आधार बनलेत. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्यांना ते मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करत आहेत.

ऑक्सिजनची गरज असेल्यांनी संपर्क करावा

समाजाप्रति आपलं कर्तव्य ओळखून सचिन परब जनतेच्या मदतीसाठी पुढे आलेत. ऑक्सिजनची कमतरता शक्यतो कुणाला भासणार नाही, याची काळजी परबांकडून घेतली जातेय. मांद्रे मतदारसंघात ऑक्सिजनची कुणाला गरज भासल्यास त्यांना घरपोच सोय देण्यात येईल असं परबांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे गरजूंनी मदतीसाठी आपल्याला संपर्क करावा, असं आवाहन परबांकडून करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!