तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवाः कोरगांवकर

पूर येण्यामागचं कारण शोधण्यासाठी 'मिशन फॉर लोकल' संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगांवकरांनी दिली तिलारी धरणाला भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

धारगळः पूर येणं हे नैसर्गिक होतं. तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवा चुकीची आहे. मुळात हे दरवाजे बंदच केले नव्हते, हे दरवाजे २० ऑगस्ट नंतरच बंद केले जातात, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली असल्याचं ‘मिशन फॉर लोकल’ संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगांवकर यांनी सांगितलंय.

हेही वाचाः सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

गेल्या काही दिवसांपूर्वी पेडण्यातील हळर्ण, तळर्ण, चांदेल, इब्रामपूर भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. त्या पूरात अनेक लोकांचं नुकसान झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अनेकांची शेती वाहून गेली. पुरस्थितीची पहाणी केल्यानंतर पूर येण्याचं कारण जाणून घेण्यासाठी कोरगांवकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तिलारी धरणावर जाऊन माहिती घेतली.

हेही वाचाः PROUD MOMENT | राजतिलक नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पूर येणं हे नैसर्गिक

राजन कोरगांवकर यांनी पहाणी केल्यानंतर असं निर्देशनास आलं, की पूर येणं हे नैसर्गिक होतं. तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवा चुकीची आहे. मुळात हे दरवाजे बंदच केले नव्हते, हे दरवाजे २० ऑगस्ट नंतरच बंद केले जातात, असे सुत्रांकडून समजतंय.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर

तर नुकसानग्रस्तांचं प्रमाण काही अंशी कमी झालं असतं

तिलारी धरणाचं वाढलेलं पाणी गोव्यात पोचण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतात. सतर्कतेचा इशारा दिला असता, तर नुकसानग्रस्तांचं प्रमाण काही अंशी कमी झालं असतं, असं कोरगांवकरांनी म्हटलं. पेडण्यातील स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नुकसानग्रस्तांची रस्त्यावर थांबूनच विचारपुस केली खरी. पण माणसांच्या वेदना आणि पूर येण्यामागील कारणं जाणू घेण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न कोरगावकरांनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Inside Story | अविश्वास ठराव रोखण्यासाठी कार्यालयाला टाळ्याचा षडयंत्र

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!