RSC MAUX ची बाजी…

आंबेली बॉयज यांनी पाचव्या अखिल गोवा लोकल फ्लड लायट् व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं.

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः आंबेली बॉयज यांनी पाचव्या अखिल गोवा लोकल फ्लड लायट् व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. या टुर्नामेंटला विविध संघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २ जानेवारी आणि ९ जानेवारी २०२१ असं या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं.

कोण ठरला विजेता?

पाचव्या अखिल गोवा लोकल फ्लड लायट् व्हॉलीबॉल टुर्नामेंट चांगलीच रंगली. या टुर्नामेंटमध्ये संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. RSC MAUX यांचा पराभव करून सातेरी सिद्धनाथ संघ खोतोडे या टुर्नामेंटचे विजेता ठरले.

विजेता संघाला आकर्षक बक्षिसं

या टुर्नामेंटमध्ये सातेरी सिद्धनाथ संघ खोतोडे यांनी विजय प्राप्त केला. त्यांनी रोख ५०००/- व चषक पटकविलं. तर अंतीम सामन्यात पराभूत झालेल्या RSC MAUX यांना रोख ३०००/- आणि चषक देण्यात आलं.

उत्कृष्ट खेळप्रदर्शन केलेल्यांचाही गौरव

उत्कृष्ट लिफ्टर म्हणून सुधीर गांवकर (सातेरी सिद्धनाथ संघ) खोतोडे व उत्कृष्ट स्पॉयकर म्हणून बक्षीस देण्यात आलं. तर शुभम गांवकर व इमरजिंग लिफ्टर विठोबा गांवकर (RSC MAUX) व साईल गांवकर, नितेश गांवकर, अंकेश गांवकर, गुरुदास गोलकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय पटकवला.

विजेच्या स्पर्धकांना क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. क्लबच्या अध्यक्षांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!