दोन घरं फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

कुचेरी, दत्तवाडी येथे चोरी; एकाच टोळीचं काम असण्याचा संशय

Goan Varta Live | प्रतिनिधी

बार्देश: म्हापसा परिसरात झालेल्या दोन घरफोड्यात चोरट्यांनी सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाल्या आहेत.

हेही वाचाः पत्नीवर सुरा हल्ला; संशयित पतीविरुद्ध गुन्हा

कुचेरी, दत्तवाडी येथे चोरी

कुचेली येथील तेजस शेट्ये यांच्या घरात चोरी करण्यात आली. भांडी तसंच रोख दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले, तर दुसरी घटना दत्तवाडी येथे घडली. येथील संजय नेत्रावळकर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला आणि घरातील भांडी तसंच दीड लाख रुपये लंपास केले.

एकाच टोळीचं काम असण्याचा संशय

दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीच्या साम्य असल्यानं एकाच टोळीचं हे काम असावं, असा पोलिसांचा कयास आहे. म्हापसा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | कृष्णा उर्फ दाजी साळकर यांचा हल्लाबोल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!