पुरात घर कोसळलेल्या कुटुंबांना दीड ते २ लाख रुपयांची मदतः मुख्यमंत्री

१५ ऑगस्टपर्यंत देणार नुकसान भरपाई; किरकोळ नुकसान झालेल्या घरांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतची मदत करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुरात घर कोसळलेल्या कुटुंबांना दीड ते २ लाख रुपयांपर्यंत मदत १५ ऑगस्टपर्यंत देणार. तसंच घराचं मोठे नुकसान झालेलंं असल्यास १ लाख रुपयांपर्यंत, तर कमी नुकसान झालेल्यांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतची मदत सप्टेंबरपर्यंत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिलीये.

हेही वाचाः कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी

मोठं नुकसान झालेल्यांना दीड ते दोन लाखांची आर्थिक मदत

राज्यात नुकत्याच आलेल्या महापूरात ज्या कुटुंबांची घरं पूर्णपणे कोसळली आहेत त्यांना राज्य सरकार 1.5 लाख ते 2 लाख रुपयांची भरपाई देईल. ही मदत 15 ऑगस्टपूर्वी कुटुंबांना देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे. ज्या घरांचं मोठं नुकसान झालंय त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातील. याउलट, ज्या घरांचं किरकोळ नुकसान झालंय, त्यांना यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत 25,000 ते 50,000 रुपयांची भरपाई दिली जाईल असल्याचं मुख्यमंत्री बोलताना म्हणालेत.

हेही वाचाः गोवा सरकारचा 1 हजार कोटींचा कोळसा घोटाळा?

मागच्या आठवड्यात आला पूर

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सुचवलेल्या भरपाईमध्ये राज्य सरकारच्या वतीने जास्तीची रक्कम जोडून पीडित लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तिळारी आणि म्हादई खोऱ्यात 3 दिवसात 15 ते 25 सेंटीमीटरच्या तीव्र पावसामुळे अचानक पूर आला. जवळपास ५०० घरांचं नुकसान झालं. सलग आठ दिवस लागलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्याच्या अंतर्भागात, विशेषत: पश्चिम घाटातील अनेक गावांना पूर आल्याने लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | पावसाळी अधिवेशन | शेतकऱ्यांच्या वेळेत नुकसान भरपाई का मिळाली नाही?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!