मेथर हत्याप्रकरणी तपास सीबीआयकडे द्या- रोहन खंवटे

Goan Varta Live | प्रतिनिधी
पर्वरी : विलास मेथर हत्याप्रकरणी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे. 14 ऑक्टोबरला विलास मेथर यांना जिवंत जाळण्यात आलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
20 तारखेला सुनावणी?
विलास मेथर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य संशयित आरोपी बिल्डर शब्बीर यारगट्टी आणि खय्याद शेख यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. जिल्हा सत्र न्यायालयात या जामीन अर्जावर 20 तारखेला सुनावणी होणारे. दरम्यान, रोहन खंवटे यांनी सीबीआय तपासाची मागणी केलीय.
सरकार कुणाला वाचवतंय का?
महत्त्वाचं म्हणजे सरकार त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठई पोलिस यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोपही रोहन खंवटे यांनी केला आहे. सध्या पोलिस विलास मेथर प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.