खंवटेंकडून पर्वरी आरोग्य केंद्राला ‘कोव्हिड असिस्ट’

पर्वरीतील वाढच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः पर्वरीतील रुग्णांना त्यांच्या निवासस्थानातून जीएमसीसारख्या रुग्णालयात नेण्याचा वेळ कमी करण्यासाठी स्थानिक आमदार रोहन खंवटेंनी गुरुवारी ‘पर्वरी रायझिंग’च्या मार्गदर्शनाने स्थानिक आरोग्य केंद्राला “कोव्हिड असिस्ट” रुग्णवाहिका दान केली. खंवटेंनी गुरुवारी आरोग्य अधिकारी डॉ. विकास यांना हे वाहन सुपूर्द केलं.

हेही वाचाः विजय सरदेसाईंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

रुग्णाला इस्पितळात नेण्याचा वेळ वाचणार

आरोग्य विभाग या रुग्णवाहिकेवर आपला ड्रायव्हर तैनात करेल, जो चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असेल. पर्वरी भागातील कोविड-19 च्या केसेस चिंताजनकरित्या वाढत आहेत, ज्यामुळे आरोग्य केंद्र आणि त्याच्या पायाभूत सुविधांवर कामाचा ताण वाढतोय. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जीएमसीत किंवा इतर रुग्णालयात नेण्याचा भार कमी करण्यासाठी रुग्णवाहिकेचं हे दान त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.

हेही वाचाः खाटांसह डॉक्टरांचीही कमतरता

दोषारोपाची ही वेळ नव्हे

आरोग्य केंद्रात ‘चाचणी’ आणि ‘लसीकरण’ सुविधा एकाच भागात असल्यामुळे कोविड वेगाने प्रसरण्याची भीती अधित आहे. जेव्हा हा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला, तेव्हा त्यांनी त्यावर त्वरित सुधारात्मक उपाययोजना स्वीकारल्या. आरोग्य क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत. पण त्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र लढा द्यावा लागेल. दोषारोपाच्या खेळात गुंतण्याची ही वेळ नाही, असं खंवटें म्हणाले.

हेही वाचाः जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस; तर मुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचं कौतुक

या महामारीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओव्हरटाइम करत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचं खंवटेंनी यावेळी कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना खंवटे म्हणाले की, प्रत्येक पंचायत स्तरावरील महामारीच्या परिस्थितीचं सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहभागाने कार्यक्रम आखण्याची मुख्यमंत्र्यांची योजना खरोखरंच चांगली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!