ROBBERY | फोंड्यात दोघा चोरट्यांना अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा: राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. मडगाव येथे असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. मात्र पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आल्यानं स्थानिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येतोय.
हेही वाचाः ROBBERY | घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
दोघा मोबाईल चोरट्यांना अटक
फोंडा पोलिसांनी दोघा मोबाईल चोरट्यांना शुक्रवारी रात्री अटक केली. योगेश शांबा कळंगुटकर (वय २५, रा . होंडा – सत्तरी ) आणि राजेश दयाराम हय्यर (वय २०, रा . म्हापसा) अशी या संशयितांची नावं आहेत. या दोघांकडूनही पोलिसांनी चोरीचे दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. एका मोबाईलची किंमत सोळा हजार, तर दुसऱ्या मोबाईलची किंमत चौदा हजार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचाः पुरामुळे फोंडा तालुक्यात ४२६ घरांची हानी
दुचाकीस्वारांकडे ‘लिफ्ट’ मागण्याच्या बहाण्याने चोरायचे मोबाईल
कुंडई आणि भोम येथून हे दोन्ही मोबाईल पळवले असल्याचं संशयितांनी पोलिसांना सांगितलं. बऱ्याचदा दोन्ही संशयित दुचाकीस्वारांकडे ‘लिफ्ट’ मागण्याच्या बहाण्याने त्यांचे मोबाईल चोरत होते. राज्यातील अन्य मोबाईल चोरीप्रकरणी या संशयितांचा हात आहे का, यासंबंधी फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.