नावेलीत दिवसाढवळ्या फ्लॅट फोडला

दीड लाखांचं सोनं लुटलं; अडीच लाखांची रोकडही लंपास

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः रातवाडा – नावेली येथे मंगळवारी भरदिवसा एक फ्लॅट फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी सुवर्णालंकार व रोकड मिळून लाखोंचा ऐवज पळवला. घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधीसाधून चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी फ्लॅट मालक अब्दुल मुल्ला यांना मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीये. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीती पसरलीये.

दागिने तसंच रोकड लंपास

१० ते दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून आत घुसून कपाट फोडलं व आतील १ लाख ७७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. यात सात अंगठ्या व एक डायमंड पेंन्डेंटचा समावेश आहे. तसंच रोख रुपये दोन लाख पन्नास हजार रोकडही लंपास केली.

पुढील तपास सुरू

चौथ्या मजल्यावर हा फ्लॅट असून, तक्रारदार मुल्ला काही कामानिमित्त बाहेर गेले होते तसंच घरातील अन्य मंडळीही बाहेर गेली होती. फ्लॅट बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधून ही चोरी केली. भादंसच्या ४५४ व ३८० कलमाखाली पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतलं आहे. पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!