थिवीत महिलांच्या दागिन्यांची चोरी

मंगळवारची घटना; संशयितांना अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: दागिने पॉलिस करून देतो असं सांगून थिवी येथील दोन महिलांचे 50 हजारांचे 14 ग्रॅम सोने चोरी केली. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी महम्मद मोहीदसीया महिरीद्दीन (25) आणि जितेंद्र सुधीर सहा (27) या दोघाही बिहारमधील संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचाः भाजपचे असंतुष्ट आमदार मगोच्या संपर्कात!

मंगळवारची घटना

ही घटना मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास औचितवाडा थिवी येथे घडली. संशयित आरोपी दागिने साफ करण्यासाठी थिवीमध्ये फिरत होते. फिर्यादी आश्विनी सापटे आणि शेजारील उज्वला नर्से यांनी आपल्या बांगड्या संशयितांकडे साफ करण्यासाठी दिल्या.

बांगड्या मूळ वजनापेक्षा कमी असल्याचं समजलं

संशयितांनी बांगड्या साफ करून दिल्यानंतर फिर्यादीं सोपटे आणि नर्से यांना आपल्या बांगड्या मुळ वजनापेक्षा कमी असल्याचं समजलं. संशयितांनी सोपटे यांच्या बांडग्यातून 6 ग्रॅम, तर नर्से यांच्या बांगड्यातून 8 ग्रॅम सोनं चोरलं होतं.

प्रकार समजताच केला आरडाओरडा

हा प्रकार समजताच त्यांनी आरडाओरडा केली आणि शेजारील लोकांच्या मदतीने त्यांनी संशयितांना पकडून बेदम चोप दिला. नंतर कोलवाळ पोलिसांना पाचारण करून संशयितांना त्यांच्या स्वाधीन केले.

संशयित मूळ भगलपूर बिहारचे

दोन्ही संशयित मुळ भगलपूर बिहारमधील असून मडगाव थिवी रेल्वे स्थानकाच्या शेजारी ते वास्तव्यास होते. पोलिसांनी भा.दं.सं.च्या 379 कलमाखाली गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महादेव परब करीत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Leophard & Cat | बिबट्या आणि मांजर विहिरीत पडल्यानंतर काय झालं?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!