सासष्टीत चोरांचा सुळसुळाट

दुचाकीवरून सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार वाढले

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांना हेरून मोटरसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या घेऊन पळ काढणाच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने सासष्टीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी बाणावली आणि कुडतरी येथे लागोपाठ अशा दोन घटना घडल्या. सोनसाखळ्या पळविण्याच्या या नवीन मोडस ओपरेंडीमुळे पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | शुक्रवारी कोरोना मृतांचा आकडा घटला

मंगळवारची घटना

मंगळवारी दुपारी २ वा.च्या सुमारास पहिली घटना घडली. बाणावली मारिया हॉल परिसरात मासे विकणाऱ्या दोन महिलामासे विकून आपल्या स्कूटरवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा युवकांनी गाडी चालू असतानाच एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या झटक्याने त्या दोन्ही महिला स्कुटरवरून खाली पडल्या असता त्या दोन युवकांनी महिलेच्या गळ्यातील दागिने घेऊन पळ काढला. या महिलांनी आरडाओरडा केल्यावर लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ते हाती लागले नाहीत. त्याच दिवशी दुपारी ४ वा.च्या समारास कुडतरी आरोग्य केंद्राजवळही असाच प्रकार घडला. चांदरहून कुडतरीच्या दिशेने स्कुटरवरून जात असलेल्या युवतीचा याच युवकांनी मोटरसायकवरून पाठलाग करत गाडी चालू असतानाच सोनसाखळी खेचून पळ काढला.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यू वाढीचं सत्र कायम; अजून 7 दिवसांनी कर्फ्यू वाढवला

कुडतरीत भीतीचं वातावरण

या प्रकरणी कोलवा आणि मायणा कुडतरी पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अजून त्यांच्या हाती काही धागेदोरे सापडलेले नाहीत. कुडतरी येथे झालेल्या चोरीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे लोकांतही भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हा व्हिडिओ पहाः

DOCTORS DAY | राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सत्कार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!