रस्ते खड्डेमय, प्रशासनाचं दुर्लक्ष, सरकारचा हलगर्जीपणा अजून किती दिवस?

आम आदमी पक्षाचा संतप्त सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अखेर खड्डेमय रस्त्यातून गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि विसर्जनाच्या वेळीही याच खड्डेमय आणि धोकादायक रस्त्यावर गोंयकारांना प्रवास करावा लागला आहे. रस्त्याची ही बिकट अवस्था बघून कोट्यवधींच्या गप्पा करणाऱ्या शासनाचे खड्ड्यांकडे का दुर्लक्ष होतं, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. राज्य सरकारचा हा हलगर्जीपणा अजून किती दिवस चालणार? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाचे (आप) नेते राहुल म्हांबरे यांनी उपस्थित केला

‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि थिवी विधानसभा प्रभारी रेशेश बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली थिवीमधील रस्त्यांच्या धोकादायक स्थितीविरोधात आंदोलन छेडण्यात आलं. या रस्त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या काळात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रहिवाशांनी या परिस्थितीसाठी स्थानिक आमदार निळकंठ हलर्नकर यांना जबाबदार धरलं आहे.

थिवीमधील रस्ते मोटरेबल रस्त्यापेक्षा ऑफरोडिंग ट्रॅकसारखे दिसतात

हळर्णकर विकासासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. हा विकास किती झाला हे स्पष्टपणे दिसत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. थिवीमधील रस्ते मोटरेबल रस्त्यापेक्षा ऑफरोडिंग ट्रॅकसारखे दिसतात. सरकारच्या अपयशामुळे स्थानिक त्रस्त असून नाराजी व्यक्त करत आहेत. नुकताच ‘आप’ने रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर आंदोलन केलं आहे. छोट्या रस्त्यांपासून ते अटल सेतूची देखभाल करण्यापर्यंत सर्वकाही सुधारण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं म्हांबरे म्हणाले.

सरकारकडून मुलभूत मोटरेबल रस्ते का मिळत नाहीत?

गोंयकार सर्व कर भरतात तेव्हा सरकारकडून मुलभूत मोटरेबल रस्ते का मिळत नाहीत? असा प्रश्न ‘आप’चे नेते आणि थिवी विधानसभा प्रभारी रेशेश बोंद्रे यांनी केला.

थिवीमध्ये प्रवास करणं हा एक अत्यंत धोकादायक खेळ बनला आहे. पावसात हे रस्ते वाहून जातात ही समस्या सोडविण्यासाठी सरकारला स्वारस्य नाही, असं म्हांबरे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!