पुन्हा एकदा रस्ता खचला! 10 दिवसांतली दुसरी घटना

सुदैवानं रस्त्यावरुन कोणतं वाहन जात नव्हतं!

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव : दक्षिण गोव्यातून जात असला, तर आता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मडगावात रस्ता खचण्याचं सत्र सुरुच आहे. १० दिवसांच्या आतच पुन्हा एकदा रस्ता खचल्याची घटना घडलीये.

दक्षिण गोव्यातील रस्ते बांधकामावरच सवाल उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे. कोलवा सर्कलजवळ रस्त्याला भलंमोठं भगदाड पडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कोलवामध्ये रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. कोलवा रिंग रोडवर रस्ता खचला. सुदैवानं यावेळी कोणतीही गाडी रस्त्यावरुन जात नव्हती. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.

दरम्यान, अशीच घटना बरोबर ३० जूनलाही घडली होती. आता जेवढा रस्ता खचलाय, त्याही पेक्षा जास्त मोठं भगदाड रस्त्याला पडल्याचं ३० जूनला बघायला मिळालं होतं. कोलवा सर्कलजवळ पडलेल्या भगदाडानंतर आता कोलवा रिंगरोडवरही रस्ता खचल्यानं एकूण या बांधकामावरच सवाल उपस्थित झालेत. विशेष म्हणजे गुरुवारी जिथ रस्ता खचलाय, त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच सांडपाणी वाहिनी टाकण्याचं काम झालं होतं.

हेही वाचा : एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

दरम्यान, आता तिथंच रस्ता खचल्यानं मातीचा भरवा का टाकण्यात आला नव्हता, असा सवालही उपस्थित केला जातोय. रस्ता खचल्याची माहिती मिळताच तातडीनं हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

हेही वाचा : श्रीपादभाऊंना बंदरे, पर्यटन तर नारायण राणेंकडं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!