काही दिवसांपूर्वी पंकजने फेसबूक पोस्ट केली होती, दुर्दैवानं ती खरी ठरली! आरजे पंकजच्या निधनानं अनेकांना धक्का

वयाच्या 41व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण हार्टअटॅक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रेडिओ मिरचीमध्ये काम केलेल्या पंकज कुडतरकर यांचा वयाच्या 41व्या वर्षी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी त्यांच्या मृत्यूच्या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलाय. आरजे आणि सूत्रसंचालक म्हणून अल्पावधिक पंकज यांनी आपलं नाव कमावलं होतं. त्यानंतर ते इव्हेंट मॅनेजमेन्टमध्ये आपला व्यवसाय उभारु पाहत होते. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्यात या 41 वर्षीय आरजे आणि सूत्रसंचालकाचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं गोव्यातील कलाकारांसह अनेक रसिक प्रेक्षकांनी दुःख व्यक्त केलंय. पंकज यांचा मृत्यूनं अनेकजण हळहळले आहेत.

जगणं नश्वर आहे. कोणत्या क्षणी काय होईल? होत्याचं कधी नव्हतं होईल.. हे कुणीच कधीच सांगू शकत नाही. रविवारची सकाळ अशीच पंकज यांच्या मृत्यूची धक्कादायक आणि हादरवून सोडणारी बातमी समोर घेऊन आली. पंकज यांच्या निधनाच्या वृत्तानं अजूनही अनेकजण स्वतःला सावरु शकलेले नाहीत.

करिअरमधील उतारचढाव, प्रचंड संघर्षात पंकजने कधीच हार मानली नव्हती. नेहमी ऍक्टीव्ह आणि प्रयोगशील असणाऱ्या पंकजच्या अकाली जाण्यानं अनेकांना हादरवलंय. पंकज आज आपल्यात नाही, यावर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाहीये.

आपल्या मृत्यूच्या काही तास आधीही तो सोशल मीडियावर ऍक्टीव्ह होता. 2 सप्टेंबरला त्यानं लिहिलेली ही फेसबूक पोस्ट..

कुछ नही रखा आज है कल नहीं..
टाईम आए तो चुपचाप जाने का
अगले पल का भरोसा नहीं रे बाबा…

हे शब्द पंकजच्याच बाबतीत दुर्दैवानं खरे झाले… आपल्या सूत्रसंचालनानं गोव्यातील रसिकांच्या मनावर कमी काळातच अधिराज्य गाजवाणारा पंकज आज जरी आपल्यात नसला तरीही त्यांच्या काही कलाकृती गोंयकार रसिक कधीच विसरु शकणार नाही, हे नक्की..

दरम्यान, गेल्या काही काळात हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हृदयविकाराला हलक्यात घेणं जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस फेम आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर आता गोव्यातील आरजे पंकज कुडतरकरचा झालेला मृत्यू, या घटना काळजी वाढवणाऱ्या आहेत. वयाच्या चाळीशीत हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. इतकंच काय तर एक सीसीटीव्ही व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला होता. ज्यात वर्कआऊट केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या एका तरुणावर काय परिस्थिती ओढावली होती, हे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. एकूणच या वाढत्या धक्कादायक घटनांनी काळजी वाढवली आहे.

health 800X450

हार्ट अटॅकचा धोका!

तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मानसिक स्वास्थ आणि कार्डियाक अरेस्टचा एकमेकांशी थेट संबंध असल्यानं अनेक जाणकार तिशी चाळीशीतील लोकांना मानसिक स्वास्थ जपण्याचा सल्ला देतात. करिअरच्या मागे लागताना आपल्या मानसिक स्वास्थाकडे अनेकांचं दुर्लक्ष होत असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे शरीरासोबतच मानसिक आरोग्याचा आणि स्वास्थ राखणं काळाजी गरज बनली आहे.

तसंच कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. चाळीशीतील लोकांनी मित्र आणि नातलगांसोबत कामाव्यतिरीक्त संवाद वाढवण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे डायबेटीस असणाऱ्या तरुणांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अशा तरुणांना सिगरेट ओढणं किंवा तंबाखू खाणं तत्काळ थांबवलं पाहिजे.

लाईफस्टाईलमधील बदल, विचित्र खाणं आणि व्यायामाच्या कमपरतेमुळे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो. तसंच हायपरटेन्शन, हायबिटिस, स्थूलपण असलेल्यांना तरुणांनी चेकअप करावा, असाही सल्ला डॉक्टर देतात. दरम्यान, अनेकांना हे अनुवांशिक सुगर किंवा हायपरटेन्शन असल्यास त्यांनी ईसीजी, 2डी इको या टेस्ट करणं गरजेचं ठरतं.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!