कन्नडिगांना निवडणूक लढवण्यास आरजीचा विरोध, ‘हे’ आहे कारण…

गोवा कन्नड महासंघाचा पक्षातर्फे निषेध

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा कन्नड महासंघाने गोव्यातील पंचायत निवडणुका लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा आरजी पक्षातर्फे निषेध करण्यात आला. गोवा कन्नड महासंघाने कर्नाटकने म्हादई नदीवर धरण बांधून पाणी पळवले आहे, त्यावर आपली भूमिका अगोदर स्पष्ट करावी, असे आवाहन आरजीचे नेते तथा आमदार विरेश बोरकर यांनी केले आहे.
हेही वाचाःपरप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…

लोकांनी गोव्याविषयी कधीच योगदान दिलेले नाही

गोवा-कर्नाटक म्हादई नदीवरून एवढी वर्षे वाद सुरू असताना या गोव्यात राहणाऱ्या कन्नड महासंघाच्या लोकांनी कधीच आवाज उठवलेला नाही. अशावेळी या लोकांनी आपल्या कर्नाटक राज्याला सहकार्य केले आहे. एवढी वर्षे गोव्यात राहून या लोकांनी गोव्याविषयी कधीच योगदान दिलेले नाही. आता पंचायत निवडणुका लढवून हे लोक गोव्यात आपली सत्ता गाजवू पाहत आहेत. गोमंतकीयांनी आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. आरजी पक्ष या कन्नडवासीयांना गोव्यात निवडणुका लढवायला देणार नाही, असे आमदार बोरकर म्हणाले.
हेही वाचाःफोंड्यात व्होल्वो बस, प्रवासी बसमध्ये टक्कर…

कन्नडिंगांविरोधात गोमंतकीयांनी जागरूक व्हावे

या परप्रांतीय लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरजीने संघटना स्थापन केली आहे. गेली अनेक वर्षे परप्रांतीय लोकांनी बेकायदेशीर गोव्यात जागा घेऊन आपले धंदे, उद्योग सुरू केले आहेत. सरकारी नोकऱ्याही या लोकांना मिळत आहे. पंचायत निवडणुका लढवून हळूहळू हे लोक विधानसभेच्या निवडणुका लढणार आहेत. गोव्याची सत्ता या लोकांच्या घशात घालू नये. यासाठी गोव्यातील सर्व स्थानिक लोकांनी आता जागरूक होण्याची गरज आहे, असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 
हेही वाचाः’हे’ आहेत श्रीलंकेचे नवे पंतप्रधान…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!