RGचा मेळावलीवासियांना पाठिंबा, एकत्र येण्याचं आवाहन

आयआयटीविरेधात प्रचंड आक्रोश

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गेले दोन दिवस मेळावलीतील आंदोलन पेटलंय. दगडफेक, लाठीचार्जनंतर हे आंदोलन अधिकच चिघळलंय. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक या आंदोलनाबाबत गप्प असताना रिव्होल्यूशनरी गोवन्स मेळाववीतीव आंदोलनात उडी घेतली आहे.

मेळावलीतील लोकांना आपली गरज असून राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या आरजीचा कार्यकर्त्यांना एकत्र जमण्याचं आवाहन करण्यात आलंय. चार वाजता वाळपईमध्ये जमण्याबाबतची फेसबूक पोस्ट आरजीकडून करण्यात आली.

मेळावलीवासियांचा विरोध झुगारुन सरकारनं केलेल्या पोलिसबळाच्या वापराचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जातोय. त्यातच वाळपईच्या दिशेने मेळावलीतील आंदोलकांनी मोर्चा काढलाय. वाळपई पोलिस स्थानकावर हा मोर्चा काढण्यात आलाय. आपल्या असेतित्वाती लढाई लढणाऱ्या मेळावलीतील आंदोलकांना आक्रोश पाहायला मिळतोय.

नक्की वाचा – ‘या’ कारणामुळे मेळावलीतील लोकांचा आयआयटीला विरोध

संतापलेल्या आंदोलकांनी आयआयटीविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आता आरजी या आंदोलनात काय भूमिका वठवतं हे पाहणंही महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!