रीव्होल्यूशनरी गोवन्सतर्फे मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसात तक्रार

साखळीतील नव्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी कलम १४४चं उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन केली तक्रार

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री प्रमोद सावंतांविरुद्ध रीव्होल्यूशनरी गोवन्सने (आरजी) पोलिस तक्रार दाखल केलीय. आरजी संघटनेने डिचोली पोलिस स्थानकात ही तक्रार दाखल केलीय. साखळीतील नव्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कलम १४४चं उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन आरजी संघटनेने ही तक्रार दाखल केलीय.

हेही वाचाः खाटांसह डॉक्टरांचीही कमतरता

मनोज परब म्हणतात…

राज्यात कोविडच एवढं मोठं संकट असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत शेकडो लोकांना एकत्र करून पुलाचं उद्घाटन कसं करू शकतात. डॉ. प्रमोद सावंत हे एका जबाबदार पदावर विराजमान आहेत. जो व्यक्ती लोकांना उपदेशाचे डोस पाजतो तोच नियमांचं उल्लंघन कसं करू शकतो, असा सवाल आरजी संघटनेचे नेते मनोज परबांनी केलाय. सामान्य लोकांना सगळे कायदे लागू होतात मात्र मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार सगळे नियम खुलेआम मोडत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांपेक्षा जास्त अहंकार आणि सत्तेचा माज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताच्या डोक्यात भरला असल्याचा आरोप मनोज परबांनी केलाय.

हेही वाचाः जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस; तर मुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात

आता मुख्यमंत्र्यांनाच तडीपार करण्याची गरज

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोतोर कांय फातोर असा संतप्त सवाल मनोज परबांनी केलाय. मुख्यमंत्र्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुख्यमंत्र्यांचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचं मनोज परबांनी सांगितलंय. आम्ही मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिचोली पोलिसात तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या गुन्ह्याविरुद्ध पोलिस आता काय कारवाई करतात हे पहावं लागेल असं मनोज परब म्हणाले. विनाकारण माझ्याविरुद्ध तडीपारीचा ससेमिरा लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता तडीपार करण्याची गरज असल्याचंही परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!