बाचाबाची! होंडामध्ये आरजी विरूद्ध भाजप संघर्ष पेटला

रिव्होल्यूशनरी गोवन्सने जारी केला व्हिडीओ

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : होंडामध्ये आरजी विरुद्ध भाजप संघर्ष पेटला. भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी बाचाबाचीचा व्हिडीओ रिव्होल्यूशनरी गोवन्सने समोर आणलाय. त्यानंतर आता पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

दोन्ही गटांत बाचाबाची

होंडा मतदारसंघात शुक्रवारी रात्री भाजपने आयोजित केलेल्या बैठकीवेळी आरजीच्या गोंयचो पात्रांव न्यूज पोर्टलच्या मुलांनी भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी दोन्ही गटांत बरीच बाचाबाची झाली. या मुलांना व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडण्यात आल्याने त्याचे पर्यावसान शनिवारी या दोघांविरोधात वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय.

आचारसंहीता लागू असताना बैठक कशी घेता?

राज्यात आचारसंहीता लागू असताना आणि निवडणूकीच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीची बैठक कशी काय घेता येते,असा सवाल आरजीच्या कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीची खबर कळताच गोंयचो पात्रांव या न्यूज पोर्टलच्या पत्रकारांनी तिथे धाव घेतली. या बैठकीचे व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मज्जाव करण्यात आला. यावेळी सतीश धोंड यांनी व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला. या ठिकाणी हजर राहीलेल्यांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडून ठेवल्याचेही या तक्रारीत म्हटलेय.

दरम्यान, या घटनेसंबंधी मुरमुणे-मेळावली येथील पांडुरंग नाईक, गौतम मेळेकर, निलेश गांवकर, शांताराम गांवकर आणि कल्पेश गांवकर यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!