रिव्होल्यूशनरी गोवन्सतर्फे खाजन पाळीतील पूरग्रस्तांना मदत

सोमवार २ ऑगस्ट पासून समाजकार्याला सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

साखळी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी सोमवार २ ऑगस्ट पासून समाजकार्याला प्रारंभ केला. या मतदारसंघातील पूरग्रस्त भागात त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्यकर्त्यांना घेऊन पाहाणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना कडधान्य, कपडे ,चटया, टॉवेलव इतर आवश्यक उपयोगी समान दिलं.
यावेळी त्यांच्यासोबत आरजीचा वेल्ली समूह होता.

हेही वाचाः होमलोन योजना! 3 आठवड्यात अतिरीक्त बाजू मांडा, हायकोर्टाची सरकारला मुदत

आरजीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर

जाती, प्रांतभेद विसरून गोंयकार पूरग्रस्त गोंयकारांना शक्य होईल तेवढा मदतीचा हात देत आहेत. गोव्याच्या विविध भागातील आरजीचे क्रांतिकारी कार्यकर्ते गेले ७ दिवस दिवसरात्र पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करत आहेत, असं आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी खाजन पाळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी आमंत्रित करणार

गोंयकारांसाठी पारदर्शक कार्य करण्यास आरजी सक्षम

खाजन पाळी हा साखळी मतदारसंघातील भाग असूनही या भागातील पूरग्रस्त ग्रामस्थांना भेटायला आमदार तसंच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अद्याप आले नसल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी मनोज परब यांना दिली. आम्ही गोव्यासाठी तसंच मुख्यत्वे गोंयकारांसाठी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे कार्य करू शकतो, याची खात्री गोंयकारांना देऊ शकतो, असं परब म्हणाले.

हेही वाचाः पेडणेत परप्रांतीयांच्या गर्दीला बाबू आजगावकर जबाबदार !

आरजीतर्फे निवडणूक कार्य लवकरच सुरू

येत्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आरजीतर्फे निवडणूक पद्धतीचं कार्य लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आरजीचे पोगो फॅमिलीत असंख्य कार्यशील क्रांतिकारी कार्यकर्ते आहेत. जे आपल्या माय भूमिसाठी क्रांती चळवळीत सहभागी झाले आहेत. खाजन पाळी या भागातील आमदार तसंच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पूरग्रस्त ग्रामस्थांना मदत करायला पोहचत नाहीत तर काय उपयोग? आम्हाला हे समजताच आम्ही आमच्याकडून होईल तेवढी मदत त्या ग्रामस्थांना केली आहे. पूरग्रस्तांना १५ ऑगस्ट पर्यंत नुकसान भरपाई देणार असल्याचं आश्वासन मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलं आहे. त्याची त्यांनी पूर्तता करावी. कारण गेल्या वर्षी दिलेलं नुकसान भरपाईचं आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही, असा टोला परबांनी लगावलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | BHUMIPUTRA-BILL | पोगो V/S भूमीपुत्र कोण श्रेष्ठ ?


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!