एसपीसीए अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई

मंत्रीमंडळाकडून बुधवारी मंजुरी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: मागील तीन वर्षाहून अधिक काळ रिक्त असलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर (एसपीसीए) अध्यक्ष पदावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई याची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची मंजुरी मंत्रीमंडळनाने बुधवारी दिली आहे.

हेही वाचाः प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड अरुण काकडे यांचं निधन

३ एप्रिल २००७ रोजी स्थापना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात पोलिसांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गृह खात्याने ३ एप्रिल २००७ रोजी राज्यात या प्राधिकरणाची स्थापना केली. त्यावेळी निवृत्त न्यायाधीश आर. एम. एस. खांडेपारकर यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं. त्या वेळी सरकारने त्यांच्यासह सदस्य म्हणून एस. बी. एस. केरकर आणि डॉ. बी. ए. गोम्स यांची नियुक्ती केली. परंतु निवृत्त न्यायाधीश आर. एम. एस खांडेपारकर याच्या कार्यकाळ १३ एप्रिल २०१८ मध्ये संपल्या. त्यानंतर सरकारने अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी कोणतीच हालचाली केली नव्हती. त्यामुळे प्राधिकरणात फक्त दोन सदस्य राहिले होते. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही सदस्यांना २५ नोव्हेंबर २०२० रोजी मुक्त करण्यात आलं होतं. राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर (एसपीसीए) अध्यक्ष पदावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांची नियुक्ती करण्यास मंजूरी दिली आहे. 

हेही वाचाः वेर्ला येथे गाड्यांवर कोसळला आंबा

निवृत्त न्यायामूर्ती नूतन सरदेसाईंची कारकीर्द

निवृत्त न्यायामूर्ती नूतन सरदेसाई यांनी मागील तीन दशकापासून विविध न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषवून चांगले तसेच ऐतिहासिक निवाडे दिले आहे. त्यांनी त्याची कारकीर्द १९८३ पासून सुरू केली. त्यावेळी त्यांनी प्रथम वकील म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर १८ जानेवारी १९९१ रोजी डिचोली येथील प्रथमवर्ग न्यायालायचे कनिष्ठ न्यायाधीश म्हणून सुरू केली. त्यानंतर २३ जानेवारी १९९६ रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पदी बढती देण्यात आली. या वेळी त्यांनी विशेष न्यायाधीश अमली पदार्थ विरोधी न्यायालयात सेवा बजावली. या वेळी त्यानी अनेक प्रकरणात महत्त्वाचे निवाडे दिले.

हेही वाचाः मडगावात वजन-मापे खात्याची कारवाई

त्यानंतर ७ एप्रिल २००७ रोजी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश पदी बढती देण्यात आली. त्यानंतर २८ मार्च २०१६ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पदी बढती देण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती नूतन सरदेसाई गोवा खंडपीठाचे न्यायाधीश पदी रुजू झाल्यानंतर त्या १८ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्त झाला होती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!