….शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता!

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी
ब्युरो : श्रीपाद नाईक यांच्या अपघाताची महत्त्वपूर्ण माहिती समोर येते आहे. कर्नाटकमधील कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांनी ही माहिती दिली आहे. शॉर्टकटनं जाण्याचा मार्ग निवडला नसता, तर कदाचित हा अपघात घडला नसता, असा सूर उमटतोय. जीएमसीमध्ये सोमवारी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे.
रुपाली नाईक म्हणाल्या की…
ते एका धार्मिकस्थळी गेले होते. त्यानंतर येल्लापूरला गेले होत. सकाळी गोकर्णला ८ वाजता पूजा होती. यासाठी येल्लापूरहून येत होते. गोकर्णला येत असतानाचा अंकोला इथं त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

जंगलाच्या मार्गे असणाऱ्या रस्त्यानं ते गोकर्णच्या दिशेने येत होते. तो रस्ता जवळ असल्यानं त्या मार्गे श्रीपाद नाईक आपल्या पत्नीसह यायला निघाले होते. पण या मार्गातच काळानं त्यांच्या गाडीवर घाला घातला. स्थानिक आमदार रुपाली नाईक यांच्या सोबतचे सुरक्षारक्षक तिथे गेले होते. त्यांच्यासोबत होते. एका वळणावर त्यांच्या गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला.
खरंतर हायवेवरुन गोकर्णला येण्यासाठी चांगला रस्ता होता. पण तो रस्ता लांब पडेल म्हणून त्यांनी दुसरा मार्ग निवडला. हा मार्गे त्यांचा निर्णय जीवावर बेतेल, असं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं. सकाळी गोकर्णला जायला उशीर व्हायला नको, म्हणून ते येल्लापूरमार्गे यायला निघाले होते. कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांनी ही माहिती दिली आहे. त्या जीएमसीमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांची गाडीही होती. रस्ता बनत होता, त्या ठिकाणीच हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. सुरक्षारक्षकांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही अपघात झाला की काय, असाही संशय व्यक्त केला जातो आहे. गाडीमध्ये एकूण ५ जण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झालेत.
नेमका कशामुळे घडला अपघात? – पाहा व्हिडीओ

हेही वाचा – श्रीपादभाऊंबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…