शाळांवरील अतिक्रमणांची माहिती द्या!

शिक्षण विभागाच्या प्रशासकीय संचालकांचे आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील ज्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, अशा जमिनींची माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात १२ डिसेंबरपर्यंत अशा सर्व जमिनींची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत पुढच्या गुरुवारपर्यंत (१० नोव्हेंबर) सरकारी शाळांच्या इमारतीत वा जमिनींवर अतिक्रमण केलेल्यांची माहिती ‌शिक्षण खात्याच्या प्रशासकीय विभागाने मागवली आहे.
हेही वाचाःTMC Goa : ‘त्या’ नऊ निलंबित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा…

अतिक्रमण झालेल्या इमारती ताब्यात घेणार

प्रशासकीय विभागाचे संचालक महादेव आरोंदेकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. साहाय्यक जिल्हा शिक्षण पर्यवेक्षक तसेच सर्व तालुक्यांच्या भाग शिक्षणाधिकाऱ्यांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. प्राधान्याने याविषयीची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २००० सालापासून ३५० हून अधिक सरकारी प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. यांपैकी काही शाळांच्या इमारती विनावापर पडून आहेत. अशा इमारतींवर, तसेच जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. अशा अतिक्रमणांची माहिती मिळवून संबंधित अतिक्रमण झालेल्या इमारती ताब्यात घेतल्या जाणार आहेत.           
हेही वाचाःTMC Goa : ‘त्या’ नऊ निलंबित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा…

शाळांच्या बंद इमारती एनजीओ तसेच स्वयंसेवी संस्थांना दिल्या

सध्या अशा जमिनींवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यासाठी पणजी (केंद्रीय विभाग), म्हापसा (उत्तर विभाग) व मडगाव (दक्षिण विभाग) याठिकाणी इस्टेट अधिकारी कार्यरत आहेत. हे अधिकारी  सरकारी आदेशानुसार कारवाई करतात. शाळांच्या बंद इमारती सरकारने काही एनजीओ तसेच स्वयंसेवी संस्थांना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी सुरू करण्यासाठी काही ठिकाणी इमारतींची मागणी केली जाते. अशावेळी शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार या बंद इमारतींचा ताबा दिला जातो, असेही झिंगडे म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एका कार्यक्रमात सरकारी शाळांच्या इमारतींमध्ये हस्तकला केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते. राज्यातील सर्व सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचे सरकारचे हे काम वेगाने सुरू आहे.
हेही वाचाःWhat Do You Think? : व्यक्त व्हा! तुम्हाला कांय वाटत? भाऊसाहेब की पर्रीकर ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!