वास्कोचे विद्यमान आमदार बदलणं हाच वास्को समस्यांवर एकमात्र उपाय

माजी नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वास्को मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावतेय. वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेडा लोकांच्या हितासाठी हा मुद्दा उचलून धरण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळे वास्कोचे विद्यमान आमदार बदलणं हाच वास्को समस्यांवर एकमात्र उपाय आहे, असं वास्कोचे माजी नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर म्हणाले.

हेही वाचाः डेल्टा कॉर्पच्या पेडणेतील गेमिंग झोनला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची अंतिम मंजुरी

माजी नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर, नगरसेवक शमी साळकर आणि गिरीश बोरकर आणि वास्कोतील स्थानिक रहिवाशांनी गुरुवारी पाणीपुरवठा समस्यांबाबत बायणा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता नरेश पैंगिणकर यांना निवेदन सादर केलं. यावेळी ते बोलत होते.

विद्यमान आमदार वास्कोत सुधारणा घडवून आणण्यात अपयशी

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते अजूनही भाजपच्या तिकीटसाठी इच्छुक आहेत.
वास्कोचे विद्यमान आमदार वास्कोत सुधारणा घडवून आणण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळे लोक अक्षरशः कंटाळलेत, असं साळकर म्हणाले.

हेही वाचाः डॉक्टर तिळवे माराहाण प्रकरणी मिनेष नार्वेकरला सशर्त जामीन मंजूर

पाईपलाइन बदलण्याचा प्रस्ताव मंजुरी प्रलंबित राहिल्यानं रखडला

दरम्यान पीडब्ल्यूडीचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगिणकर यांनी सांगितलं, की वास्कोमध्ये जुन्या पाईपलाइन बदलण्याचा प्रस्ताव होता. परंतु मंजुरी प्रलंबित राहिल्यानं तो रखडला. वास्कोला पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. पण जुनी पाईपलाईन फुटू शकते. म्हणून ते अतिरिक्त दबाव टाकू शकत नाही.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!