जीएसटी संकलनात राज्याला दिलासा

राज्याच्या तिजोरीत कर रूपातून येणाऱ्या निधीत वाढ; मार्च २०२१ मध्ये ३४४ कोटी २८ लाख रुपये जीएसटी संकलित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: लॉकडाऊननंतर राज्यातील अर्थचक्र पूर्वपदावर येऊ लागल्यानं राज्याच्या तिजोरीत कर रूपातून येणाऱ्या निधीतही वाढ झालीये. मार्च २०२१ या एकाच महिन्यात राज्यात ३४४ कोटी २८ लाख रुपये जीएसटी संकलित झालाय. गेल्या वर्षी याच महिन्यात ३१६ कोटी ४७ लाख रुपये जीएसटी जमा झाला होता. म्हणजे यंदा २७ कोटी ८१ लाख (९ टक्के) त्यात वाढ झालीये.

हेही वाचा – पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

आर्थिक वर्षात सर्वाधिक जीएसटी मार्चमध्ये जमा

देशाच्या तुलनेत गोव्यात जीएसटी संकलनात झालेली वाढ तशी कमीच आहे. मात्र, गोवा लहान राज्य असल्याने ही वाढ दुर्लक्ष करण्याजोगी नाही. एकंदरीत आकडेवारी पाहता, मावळत्या आर्थिक वर्षात सर्वाधिक जीएसटी मार्चमध्येच जमा झाला आहे. देशाच्या पातळीवर विचार केल्यास मार्च महिन्यात १,२३,९०२ कोटी जीएसटी केंद्रात जमा झाला आहे. त्यातील केंद्राचा वाटा २२,९७३ कोटी तर राज्याचा वाटा २९,३२९ कोटी इतका आहे. आयजीएसटी ६२,८४२ कोटी इतका आहे.

हेही वाचा – चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

केंद्र सरकरने २०२०-२१ या आर्थिक वर्षात कराचा हिस्सा म्हणून गोव्याला २,२९६ कोटींचा निधी राज्याला दिलाय. गेल्या वर्षापेक्षा हा निधी १७४ कोटी जास्त आहे. या वर्षासाठी केंद्राने सर्व राज्यांना मिळूण एकूण ४५ हजार कोटींचा निधी दिलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!